Homeकला - क्रीडालॉन टेनिस स्पर्धेत आरव बेले, आहन जैन  व शौर्या पाटील, आयरा अगरवाल...

लॉन टेनिस स्पर्धेत आरव बेले, आहन जैन  व शौर्या पाटील, आयरा अगरवाल विजेते

कोल्हापूर :
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन आयोजीत व कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशन च्यावतीने एआयटीए मानांकित १४ वर्षाखालील मुले व मुली चम्पियनशीप सिरीज लॉन टेनिस स्पर्धा के.एस.ए.च्या साठमारी येथील टेनिस कॉम्लेक्स्‌‍ येथे झाली. या स्पर्धेत आरव बेले, आहन जैन  व शौर्या पाटील, आयरा अगरवाल यांनी विजेतेपद पटकावले.
१४ वर्षांखालील मुलांमध्ये एकेरीत पुण्याच्या आरव बेलेने लव परदेशीचा, तर मुलींमध्ये सांगलीच्या शौर्या पाटीलने मुंबईच्या नक्षत्रा अय्यर हिचा पराभव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. तर दुहेरीत मुलांमध्ये आरव बेले – आहन जैन यांनी, तर मुलींमध्ये शौर्या पाटील-आयरा आगरवाल या जोडीने विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू येथील मुले व मुली अशा एकूण ९० स्पर्धेकांनी सहभाग घेतला. एकूण ८० सामने झाले. एकेरीच्या अंतिम फेरीत आरव बेलेने लव परदेशीचा ६-०, ६-१ असा पराभव केला, तर मुलींमध्ये शौर्या पाटीलने नक्षत्रा अय्यर हिचा ६-०, ६-१ असा पराभव केला.
दुहेरीत मुलांमध्ये आरव बेले-आहन जैन या जोडीने उमंग सोनी-आदित्य जाधव या जोडीचा ६-४, ६-१ असा पराभव करीत विजेतेपद पटकावले. मुलींच्या दुहेरीत शौर्या पाटील- आयरा आगरवाल या जोडीने मुंबईच्या मेघना गायकवाड-बंगळूरच्या धन्वीश्री बोया शिवकुमार या जोडीचा ६-४, ६-२ असा पराभव करीत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे सुहास पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी केएसएचे ऑन.जनरल सेक्रेटरी व टुर्नामेंट डायरेक्टर माणिक मंडलिक, जॉ.जनरल सेक्रेटरी अमर सासने व सदस्य दिपक घोडके व एमएसएलटीए सुपरवायझर मेहुल केनिया, पंच प्रकाश पाटील, वरद घोरपडे, पृथ्वी पुरोहित, ओम गुजर, अमर साळुंखे, श्रेयस चौगले, सई उपस्थित होते.
या स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण करणेसाठी सुपरवायझर, पंच व ग्राऊंडस्मन पांडूरंग पोकर्णेकर व योगेश पोवार यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
30.9 ° C
30.9 °
30.9 °
66 %
5kmh
4 %
Sun
31 °
Mon
30 °
Tue
30 °
Wed
29 °
Thu
30 °

Most Popular

You cannot copy content of this page