कोल्हापूर :
उच्च प्रतीची, दर्जेदार आणि माफक दरातील मिठाई व नमकीन आता कोल्हापूरकरांना खास ग्रॅण्डेड असलेल्या ‘बिग मिश्रा पेढे’ या नावाजलेल्या कंपनीकडून उपलब्ध होणार आहे. नागाळा पार्क कमानीजवळ या कंपनीचे भव्य फॅक्टरी आऊटलेट सुरू होत आहे. या आऊटलेटचे उदघाटन रविवारी (दि. ८) दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या हस्ते व खासदार शाहू छत्रपती महाराज, कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर संजय गणेश मिश्रा यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी साडेदहा वाजता होणार असल्याची माहिती व्यवस्थापक श्रीधर बोरकर, विष्णू भांडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी धनश्री पब्लिसिटीचे ज्ञानदेव पाटील व अक्षय पाटील उपस्थित होते.
ते म्हणाले की, ‘बिग मिश्रा’ पेढे हा ब्रँड विशेषतः धारवाड पेढ्यासाठी देशभर ओळखला जातो. दीडशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या व्यवसायाची सुरुवात पंडित अवध बिहारी मिश्रा यांनी केली होती. आज मिश्रा कुटुंबीयांची तिसरी पिढी हा वारसा पुढे नेत असून, संजय गणेश मिश्रा हे सध्या कंपनीचे व्यवस्थापन सांभाळत आहेत. कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि हैदराबादमध्ये कंपनीच्या एकूण २५३ शाखा कार्यरत असून, त्यामध्ये २५० फ्रँचायजी आऊटलेटस् आणि १५० वितरकांचा समावेश आहे. गुणवत्ता, चव आणि विश्वास या त्रिसूत्रीवर आधारित कार्यपद्धतीमुळे ‘बिग मिश्रा’ने लाखो ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे.
नागाळा पार्क येथे सुमारे पाच हजार चौरस फूट जागेत उभारण्यात आलेल्या या फॅक्टरी आऊटलेटमध्ये धारवाड पेढ्यासह विविध पारंपरिक मिठाई, आधुनिक गोड पदार्थ, फराळाचे जिन्नस आणि चविष्ट नमकीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असणार आहेत. विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ थेट फॅक्टरी दरात मिळणार असल्याने, दर्जेदार मिठाई माफक किंमतीत कोल्हापूरकरांना मिळणार आहे.
या नव्या दालनामुळे कोल्हापूरच्या मिठाई बाजारात गुणवत्ता आणि विश्वासाचा नवा मापदंड निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गोड खाण्याची आवड असलेल्या प्रत्येक कोल्हापूरकरांसाठी ‘बिग मिश्रा’ पेढ्यांचे फॅक्टरी आऊटलेट हे नवे आकर्षण ठरणार आहे.
——————————
कोल्हापूरकरात उद्या ‘बिग मिश्रा पेढे’च्या फॅक्टरी आऊटलेटचे उदघाटन
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28
°
C
28
°
28
°
80 %
8kmh
100 %
Sat
29
°
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
29
°

