कोल्हापूर :
हिंदी विकास संस्थान, नवी दिल्ली यांच्यावतीने आयोजित आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड–२०२५ मध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत रुही भंडारी इयत्ता ६वी व सृजनी हलदार इयत्ता १०वी या दोन विद्यार्थिनींची ‘राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान’साठी निवड झाली. त्यांनी हिंदी विषयात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले व त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावरील हिंदी प्रतिभा सन्मानासाठी करण्यात आली.
हिंदी विकास संस्थान, दिल्ली यांच्या मार्फत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी सन्मान समारंभ–२०२५ अंतर्गत ३० जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथील तीन मूर्ती भवन, प्रधानमंत्री संग्रहालय येथे झालेल्या भव्य समारंभात डॉ. पूरन चंद टंडन – निदेशक, भारतीय अनुवाद परिषद, नवी दिल्ली, डॉ. पीयूष कुमार शर्मा – अध्यक्ष , हिंदी विकास संस्थान, दिल्ली यांच्या हस्ते रुही व सृजनीला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच हिंदी विषय शिक्षिका ज्योती मस्के यांना शिक्षक प्रशस्तीपत्र व प्राचार्य अस्कर अली यांना प्रधानाचार्य गौरव सन्मान प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
या यशाबद्दल शाळेचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती, प्राचार्य अस्कर अली, शिक्षक व पालकांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन व कौतुक केले.
——————————
आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सन्मान
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29.3
°
C
29.3
°
29.3
°
73 %
4.6kmh
90 %
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°
Sat
29
°
Sun
29
°

