Homeशैक्षणिक - उद्योग जियो स्टुडिओजकडून ऑस्कर विजेत्या ‘सिख्या एंटरटेनमेंट’चा ५०.१% हिस्सा खरेदी

जियो स्टुडिओजकडून ऑस्कर विजेत्या ‘सिख्या एंटरटेनमेंट’चा ५०.१% हिस्सा खरेदी

कोल्हापूर :
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी रिलायन्स स्ट्रॅटेजिक बिझनेस व्हेंचर्स लिमिटेडने सिख्या एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ५०.१ टक्के इक्विटी हिस्सा ₹१५० कोटींना अधिग्रहित केला आहे. हा गुंतवणूक व्यवहार २ फेब्रुवारी २०२६ रोजी पूर्ण झाला. या गुंतवणुकीमुळे रिलायन्सच्या मीडिया आणि कंटेंट क्षेत्रातील कंपनी जियो स्टुडिओजची मनोरंजन उद्योगातील उपस्थिती आणखी भक्कम झाली आहे.
गुनीत मोंगा कपूर आणि अचिन जैन यांनी स्थापन केलेल्या सिख्या एंटरटेनमेंटने गेल्या दशकात भारतीय कथांना जागतिक पातळीवर नवी ओळख मिळवून दिली आहे. ऑस्कर पुरस्कार तसेच अनेक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकणारी सिख्या ही देशातील एकमेव प्रॉडक्शन कंपनी आहे. Period. End of Sentence. आणि The Elephant Whisperers या चित्रपटांसाठी कंपनीला ऑस्कर पुरस्कार मिळाला असून मसान, सूररई पोट्रु आणि कथल यांसारख्या चित्रपटांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
जियो स्टुडिओजने मनोरंजन उद्योगात महत्त्वाची भूमिका बजावत भारतीय प्रेक्षकांना जगाशी जोडले आहे. धुरंधर, लापता लेडीज आणि स्त्री २ यांसारख्या यशस्वी चित्रपटांमुळे जियो स्टुडिओजने देशातील कंटेंट इंडस्ट्रीमध्ये स्वतःचे मजबूत स्थान निर्माण केले आहे.
या भागीदारीवर प्रतिक्रिया देताना जियो स्टुडिओजच्या प्रेसिडेंट ज्योती देशपांडे म्हणाल्या की, सिख्या एंटरटेनमेंटने नेहमीच अशा कथा सादर केल्या आहेत, ज्या खोलवर भारतीय असतानाच जागतिक प्रेक्षकांशीही नाते जोडतात. सर्जनशील उत्कृष्टता आणि सांस्कृतिक प्रामाणिकतेला महत्त्व देणाऱ्या क्रिएटर्ससोबत काम करण्याच्या आमच्या दीर्घकालीन दृष्टिकोनाचे हे भागीदारी प्रतिबिंब आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.8 ° C
28.8 °
28.8 °
79 %
8.3kmh
100 %
Thu
29 °
Fri
29 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page