कोल्हापूर :
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे छायाचित्रकार अनिल मालोजी यमकर यांची ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ जानेवारीला निवृत्ती झाली. कोल्हापूर येथील माहिती विभागाच्या दोन्ही कार्यालयाच्यावतीने तसेच जिल्ह्यातील माध्यम क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत शनिवारी त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. माहिती विभागातील छायाचित्रकार म्हणून ते कार्यरत होते. अनेक दशकांचा कोल्हापूरचा इतिहास त्यांच्या नजरेतून कॅमेराबद्ध झाला आहे.
माहिती जनसंपर्क विभागाच्या विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये शनिवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त उपसंचालक वसंत शिर्के, सध्याचे उपसंचालक प्रवीण टाके, विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष समीर देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, सांगली जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बिडकर, यमकर यांच्या पत्नी सौ. अंकिता यमकर यांच्या उपस्थितीत एका शानदार कार्यक्रमात त्यांना सपत्नीक निरोप देण्यात आला. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या कारकिर्दीवर बनवलेली चित्रफीत विशेष उल्लेखनीय ठरली.
या कार्यक्रमाला अनिल यमकर यांचे बालमित्र, आप्तेष्ट, कौटुंबिक सदस्य तसेच माध्यम क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी अनिल यमकर यांनी गेल्या ३५ वर्षात माहिती विभागाच्यावतीने केलेल्या जनसंपर्काचे कौतुक केले. माहिती विभागाचे स्थानिक संपर्क अधिकारी म्हणून त्यांची विशेष ओळख होती. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांच्या वक्तशीरपणाचे व सातत्याचे यावेळी कौतुक केले. तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विविध विभागाच्या अधिकारी व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना यमकरांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाचा उपसंचालक प्रवीण टाके यांनी विशेष उल्लेख केला. माजी उपसंचालक वसंत शिर्के यांनी अनिल यमकर यांच्या दांडग्या जनसंपर्काचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माहिती अधिकारी वृषाली पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन उपसंपादक रणजीत पवार यांनी के
माहिती विभागाचे छायाचित्रकार अनिल यमकर यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
Mumbai
few clouds
31
°
C
31
°
29.9
°
70 %
6.2kmh
12 %
Sun
31
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
28
°
Thu
28
°

