कोल्हापूर :
इंफाळ (मणिपूर) येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात आला. या संघात श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या ५ खेळाडूंची स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यवतमाळ येथे झालेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत कणेरी येथील श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. यवतमाळ येथे झालेल्या येथील या स्पर्धेमधून महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात आला. या संघात श्री काडसिद्धेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ५ खेळाडूंनी स्थान मिळविले आहे. यात समीक्षा मेंगाने, आदिती ढेरे, आसावरी पाटील, संध्याराणी जानवेकर, जान्हवी ढेरे यांचा समावेश आहे. राष्ट्रीय शालेय फुटबॉल स्पर्धा इंफाळ (मणिपूर) येथे दि. २२ ते २८ जानेवारी दरम्यान होणार आहेत.
या खेळाडूंना क्रीडा विभागप्रमुख व क्रीडाशिक्षक अमित शिंत्रे, शैलेश देवणे, विशाल सासमिले यांचे मार्गदर्शन व संस्थेचे सर्व संचालक, प्रभारी मुख्याध्यापक व्ही. के. सरगर यांचे प्रोत्साहन लाभले.
——————————
श्री काडसिद्धेश्वर हायस्कूलच्या ५ खेळाडूंची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23
°
C
23
°
23
°
53 %
2.6kmh
52 %
Thu
26
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

