• डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा तिसरा दीक्षांत समारंभ उत्साहात
कोल्हापूर :
भारताच्या विकासात शेती आणि अभियांत्रिकी क्षेत्राची निर्णायक भूमिका असून विकसित भारत केवळ धोरणात्मक चर्चेतून नव्हे, तर शेत, गाव, प्रयोगशाळा आणि तरुणांच्या नवकल्पनांतून साकार होईल. यासाठी नवनवीन तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड, पुणेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर यांनी केले.
तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभात ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष विलास शिंदे यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर (डि.लीट.) तर ओन्स्ट्रो टेक्नॉलॉजी प्रा. लि.चे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी भावित नाईक यांना डॉक्टर ऑफ सायन्स (डी.एस्सी.) या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले.
या दीक्षांत समारंभात १५ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, ११ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी, तर एकूण ९१२ विद्यार्थ्यांना विविध पदव्या प्रदान करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉ. संजय डी. पाटील होते. यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, पुजा ऋतुराज पाटील, तेजस पाटील, डॉ. अनिलकुमार गुप्ता, डॉ. जे. ए. खोत यांच्यसह बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सदस्य, गव्हर्निंग बॉडी सदस्य आणि अकॅडमी कौन्सिल सदस्य उपस्थित होते.
डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी येथे भव्य शोभायात्रेने दीक्षांत समारंभाची सुरुवात झाली. विश्वस्त पुजा ऋतुराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. विद्यापीठाच्या भविष्यातील योजनांची माहिती देऊन संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी डि.लीट. पदवीने सन्मानित विलास शिंदे, मानद डी.एस्सी. पदवी स्वीकारलेले भावित नाईक यांनी मनोगत व्यक्त केले.
डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, २०२२ मध्ये हे विद्यापीठ सुरू झाले तेव्हा ६५० विद्यार्थी होते. आज येथे ४ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ऋतुराज पाटील यांनी विद्यापीठाच्या विकासाचा रोड मॅप तयार केला आहे लवकरच हे विद्यापीठ जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवेल याचा विश्वास आहे.
कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आढावा मांडला. विद्यापीठ व प्राध्यापकांना मिळालेल्या विविध पुरस्कारांची माहिती दिली.
यावेळी डॉ. वैजयंती संजय पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री पाटील, डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राकेश कुमार शर्मा, डी. वाय. पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. मनिष भल्ला, डॉ. पी. बी. साबळे, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे डॉ. के. प्रथापन, डॉ. वारणा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे, डॉ. अजितसिंह जाधव, अजित पाटील बेनाडीकर, सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम यांच्यासह विद्यापीठाचे अधिष्ठाता, विविध संस्थांचे प्राचार्य, अधिकारी, प्राध्यापक, पदवीप्राप्त विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.शुभदा यादव, प्रा. शारुन काळे यानी सूत्रसंचालन केले.
——————————
विकसित भारतासाठी तंत्रज्ञान शेतीपर्यंत पोहोचणे आवश्यक : संजय किर्लोस्कर
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
30
°
C
30
°
27.9
°
42 %
3.1kmh
20 %
Thu
28
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

