कोल्हापूर :
देशाला महासत्ता बनविण्यासाठी शिक्षण हा घटक महत्वाचा आहे. हे ओळखून स्वामी विवेकानंदांनी युवकांच्या शिक्षणावर भर दिला. विरक्ती असणारा तरुण विवेकानंदांना अभिप्रेत आहे. आजचा तरुण हा दिशाहीन आहे. त्याला मार्ग दाखविण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन ताराराणी विद्यापीठाचे प्राध्यापक सागर वातकर यांनी केले. ते विवेकानंद कॉलेजमध्ये स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहनिमित्त आयोजित स्वामी विवेकानंद आणि युवक या विषयावर प्रमुख वक्ते बोलत होते.
प्राध्यापक सागर वातकर पुढे म्हणाले की, ज्ञान, भक्ती, वैराग्य आणि विवेक हे विवेकानंदांचे विचार अंगिकारणे गरजेचे आहे. तरुणांनी आपल्या सामर्थ्याची ओळख करुन घेऊन भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करणे आवश्यक आहे. शरीर, मन यांना जोडणारे चरित्र्य निर्माण व्हावे हे स्वामी विवेकानंदांना अभिप्रेत होते. तरुणांना आशावादी बनविणे ही आजच्या काळाची गरज असून शिक्षकांनी सजग समाज निर्मिती करावी.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात हे होते. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन प्र.प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख प्रा. अविनाश गायकवाड यांनी करुन दिली. आभार डॉ. अस्मिता तपासे यांनी मानले. सुत्रसंचालन प्रा. समीक्षा फराकटे यांनी मानले. याप्रसंगी आय.क्यु.ए.सी. समन्वयक डॉ. श्रुती जोशी, डॉ. ई. बी. आळवेकर, डॉ. कविता तिवडे, डॉ. राजश्री पाटील, डॉ. प्रदीप पाटील, प्रा. सौ शिल्पा भोसले, प्रा. एम.आर. नवले, प्रा. बी. एस. कोळी, रजिस्ट्रार एस के धनवडे, ज्युनिअर व सिनिअर कॉलेजचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
——————————
तरुणांना आशावादी बनविणे आजच्या काळाची गरज : सागर वातकर
RELATED ARTICLES
Mumbai
haze
25
°
C
25
°
25
°
69 %
2.1kmh
1 %
Fri
25
°
Sat
26
°
Sun
25
°
Mon
25
°
Tue
25
°

