कोल्हापूर :
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तसेच राष्ट्रीय युवक दिन या उपक्रमांतर्गत विवेकानंद कॉलेजमधील ग्रंथालयाच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावरील आधारित ग्रंथप्रदर्शन संपन्न झाले. या ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन प्रमुख वक्ते सागर वातकर व महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या हस्ते झाले.
ग्रंथ प्रदर्शनात स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ, शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जीवनावरील ग्रंथ, नवीन प्रकाशित ग्रंथ ठेवण्यात आले होते. याप्रसंगी सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांनी, विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करण्याचा संदेश सागर वातकर यांनी दिला. या कार्यक्रमास संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिवा प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, प्रबंधक एस. के. धनवडे यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
ग्रंथपाल डॉ. नीता पाटील यांनी स्वागत केले. सहाय्यक ग्रंथपाल हितेंद्र साळुंखे यांनी आभार मानले. ग्रंथालयातील सर्व सहकाऱ्यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘राष्ट्रीय युवक दिन’ उपक्रमांतर्गत ग्रंथ प्रदर्शन
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.8
°
C
28.8
°
28.8
°
76 %
7.3kmh
94 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°

