कोल्हापूर :
असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज यांच्या मान्यतेखाली संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर येथे आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय पुरुष व महिला टेनिस स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात व गोवा या राज्यांतील सरकारी, निमसरकारी व स्वायत्त विद्यापीठांमधील पुरुषांचे ३९ आणि महिलांचे २९ संघ सहभागी झाले होते.
या स्पर्धेत पुरुष गटात प्रथम क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठने पटकावला. द्वितीय क्रमांक मणिपाल विद्यापीठ जयपूर, तृतीय क्रमांक शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर तर चतुर्थ क्रमांक आयटीएम विद्यापीठ, ग्वालियर (मध्यप्रदेश) यांनी पटकावला.
महिला गटामध्ये प्रथम क्रमांक गोविंद गुरु ट्रायबल युनिव्हर्सिटी बांसवाडा, द्वितीय क्रमांक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तृतीय क्रमांक गुजरात विद्यापीठ तर
चतुर्थ क्रमांक लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ग्वालियरने मिळवला.
या स्पर्धेत पात्र ठरलेले सर्व पुरुष व महिला संघ १७ ते २१ जानेवारी २०२६ दरम्यान मणिपाल विद्यापीठ, जयपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय पुरुष व महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
महिला संघांचे सामने संजय घोडावत विद्यापीठाच्या कॅम्पसमधील टेनिस कोर्टवर, तर पुरुष संघांचे सामने कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन कोल्हापूर येथे पार पडले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रा. उद्धव भोसले, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे तसेच क्रीडा अधिकारी सूर्यजित घोरपडे यांनी सर्व सहभागी संघ, प्रशिक्षक, पंच व आयोजक समितीचे अभिनंदन केले आहे.
घोडावत विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय टेनिस स्पर्धा उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
29.3
°
C
29.3
°
29.3
°
70 %
5.6kmh
34 %
Fri
30
°
Sat
31
°
Sun
31
°
Mon
30
°
Tue
31
°

