• पाच खंडांतील २९ आंतरराष्ट्रीय संघ आणि ३५ देशांचे सायकलपटू येणार
कोल्हापूर :
पहिली ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’ ही पुरुषांची आंतरराष्ट्रीय सायकलिंग शर्यत नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाली आहे. युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनलच्या (यूसीआय २.२ श्रेणी) मान्यतेखाली होणाऱ्या या शर्यतीत पाच खंडांतील ३५ देशांचे प्रतिनिधित्व करणारे २९ संघ आणि १७१ एलिट सायकलपटू सहभागी होणार आहेत. ही शर्यत १९ ते २३ जानेवारीदरम्यान होणार आहे.
पुणे जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र सरकारच्या भक्कम पाठिंब्याने आयोजित ही पाच दिवसांची, ४३७ किलोमीटरची शर्यत आहे. यात एक ‘प्रोलॉग’ (सुरुवातीचा आठ किलोमीटरचा छोटा टप्पा) आणि चार प्रमुख टप्प्यांचा समावेश आहे. या शर्यतीदरम्यान सायकलपटू पुण्याच्या ऐतिहासिक स्थळांपासून ते दख्खनच्या पठारावरील आव्हानात्मक घाटांपर्यंत विविध भूप्रदेशांतून वाटचाल करतील.
या शर्यतीत फ्रान्स, ग्रेट ब्रिटन, बेल्जियम, जर्मनी, नेदरलँड्स, ऑस्ट्रेलिया, चीन आणि थायलंडसारख्या दिग्गज सायकलिंग राष्ट्रांचे संघ सहभागी होणार आहेत. खंडांनुसार पाहता, आशियातून सर्वाधिक ७८ खेळाडू, युरोपमधून ६९, ओशनियामधून १२, अमेरिकेतून ६ आणि आफ्रिकेतून ६ खेळाडू पुण्यात दाखल होणार आहेत.
सामान्यतः यूसीआय २.२ श्रेणीतील शर्यतींमध्ये जास्तीत जास्त १२५ सायकलपटू सहभागी असतात. मात्र, बजाज पुणे ग्रँड टूरने १७१ स्पर्धकांसह नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. यामध्ये ओडिशामध्ये झालेल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतून निवडलेल्या सहा भारतीय सायकलपटूंच्या संघाचाही समावेश आहे.
बजाज पुणे ग्रँड टूरला विक्रमी प्रतिसाद
RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
25.3
°
C
25.3
°
25.3
°
38 %
2.8kmh
64 %
Sun
27
°
Mon
26
°
Tue
26
°
Wed
26
°
Thu
26
°

