कोल्हापूर :
संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या महापालिका निवडणुकीच्या तारखा राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या. राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका एकाच टप्यात घेतल्या जाणार आहेत. राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ ला मतदान होणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूकही याचवेळी होईल.
राज्य निवडणूक आयोगचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी मुंबई येथे सोमवारी दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेतली. यावेळी महापालिका निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या केल्या आहेत. यामध्ये राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारीला निकाल लागणार आहे.
निवडणुकीचा कार्यक्रम…
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देश पत्र स्वीकारण्याचा कालावधी २३ डिसेंबर २०२५ ते ३० डिसेंबर २०२५ असा आहे. या नामनिर्देशन पत्राची छाननी ३१ डिसेंबर २०२५ ला होईल. तर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत २ जानेवारी २०२६ असणार आहे. निवडणूक चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी ३ जानेवारी २०२६ रोजी जाहीर होईल. त्यानंतर १५ जानेवारी २०२५ रोजी मतदान होईल. तर १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होईल.
नव्या वर्षात महापालिका निवडणूक
Mumbai
light rain
28.8
°
C
28.8
°
28.8
°
76 %
8kmh
99 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°

