Homeकला - क्रीडासमीक्षा चौगुले हिची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

समीक्षा चौगुले हिची राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर :
रांची (उत्तराखंड) मधील बिरसा मुंडा ॲथलेटिक्स स्टेडियम येथे होणाऱ्या ६९ व्या शालेय राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा २०२५-२६च्या महाराष्ट्र राज्य संघात श्री काडसिद्धेश्वर हायस्कूल कणेरीची खेळाडू समीक्षा संजय चौगुले हिची निवड झाली आहे.
अमरावती येथे झालेल्या १४ वर्षाखालील शालेय राज्यस्तरीय मुलींच्या फुटबॉल स्पर्धेतून व निवड चाचणी प्रक्रियेतून राज्य संघाची निवड करण्यात आली. ही स्पर्धा रांची येथे १७ ते २२ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. तर या स्पर्धेचे स्पर्धा पूर्व प्रशिक्षण शिबिर चंद्रपूर येथे होणार आहे.
स्पर्धेसाठी समीक्षा चौगुले हिला संस्थेचे सर्व संचालक व प्रभारी मुख्याध्यापक व्ही. के. सरगर, पर्यवेक्षक एस. के. मगदूम यांचे प्रोत्साहन तर क्रीडाविभागप्रमुख व क्रीडाशिक्षक अमित शिंत्रे, शैलेश देवणे, विशाल सासमिले यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28.8 ° C
28.8 °
28.8 °
76 %
8kmh
99 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page