Homeशैक्षणिक - उद्योग विवेकानंदच्या विद्यार्थी व एनसीसी छात्रांची पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहीम

विवेकानंदच्या विद्यार्थी व एनसीसी छात्रांची पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमंती मोहीम

कोल्हापूर :
मराठा साम्राज्याच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या घटनांची आठवण करून देणारी मोहीम व इतिहासाची साक्ष घालत पन्हाळा ते पावनखिंड परिसरातील ही आव्हानात्मक आणि प्रेरणादायी पदभ्रमंती विवेकानंद कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी व एनसीसी छात्रांनी यशस्वीरित्या पूर्ण केली. याप्रसंगी शिवकाळातील पराक्रमाची साक्ष देणाऱ्या घटना व शौर्यशाली पराक्रमाची आठवण ताजी केली.
या पदभ्रमंतीची सुरुवात पहाटे पन्हाळा किल्ल्यावरून झाली. जंगलातील वाटा, चढ-उतारांनी भरलेले डोंगररांग तसेच अवघड मार्ग पार करत विद्यार्थ्यांनी व एनसीसी छात्रांनी अत्यंत शिस्तबद्ध प्रवास केला. पावनखिंड येथे पोहोचताच सर्वांनी बाजीप्रभू देशपांडे व बांदल मावळे यांच्या बलिदानास अभिवादन केले. सर्वांनी त्यांच्या शौर्यगाथेला वंदन केले.
या पदभ्रमंती मोहिमेचे आयोजन एनसीसी मुली विभागाच्या एएनओ मेजर सुनिता भोसले व आयक्यूएसी प्रमुख डॉ. श्रुती जोशी यांनी केले. ही पदभ्रमंती मोहीम सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली. सह्याद्री प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अध्यक्ष हेमंत साळोखे, सदस्य शुभम् कोळी, प्रविण केंबळे, योगेश वेटोळे, पार्थ जाधव, केतन कांबळे, राजवर्धन आडनाईक व अखिलेश गुरव यांचे सहकार्य लाभले.
या पदभ्रमंतीच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात, ६ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे कमांडींग ऑफिसर कर्नल विक्रम नलवडे, प्रबंधक एस. के. धनवडे यांचे प्रोत्साहन लाभले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23 ° C
23 °
23 °
56 %
3.1kmh
16 %
Sun
28 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °

Most Popular

You cannot copy content of this page