• आता सर्व Unlimited 5G युजर्सना मिळणार फ्री Gemini 3 ॲक्सेस
कोल्हापूर :
जिओने आपल्या AI ऑफरमध्ये मोठा अपडेट जाहीर केला आहे. या अंतर्गत, Jio Gemini Pro Plan आता जिओच्या सर्व Unlimited 5G युजर्ससाठी पूर्णपणे मोफत उपलब्ध करण्यात आला आहे. या प्लानमध्ये गुगलचे नव्याने विकसित आणि अत्याधुनिक Gemini 3 मॉडेल समाविष्ट करण्यात आले असून, यामुळे युजर्सना आणखी शक्तिशाली आणि प्रगत AI अनुभव मिळणार आहे.
यापूर्वी ही ऑफर फक्त युवा ग्राहकांसाठी उपलब्ध होती; मात्र आता कंपनीने ती संपूर्ण Unlimited 5G युजर बेससाठी खुली केली आहे. जिओने उन्नत AI तंत्रज्ञान देशातील प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले.
कंपनीच्या माहितीनुसार, सर्व जिओ Unlimited 5G युजर्सना ₹35,100 किमतीचा Gemini Pro Plan 18 महिन्यांसाठी मोफत मिळणार आहे. ही सुविधा 19 नोव्हेंबर 2025 पासून उपलब्ध होईल आणि MyJio ॲपमधील “Claim Now” बॅनरवर क्लिक करताच ती त्वरित सक्रिय होईल.
——————————————————-
जिओने अपग्रेड केली AI ऑफर
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
50 %
2.6kmh
0 %
Fri
28
°
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°

