कोल्हापूर :
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि गूगल यांनी आज एक महत्त्वपूर्ण धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. या अंतर्गत दोन्ही कंपन्या मिळून भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर आणि प्रसार वेगाने वाढवणार आहेत. या भागीदारीचा मुख्य आकर्षण म्हणजे – जिओ ग्राहकांना १८ महिन्यांसाठी Google AI Pro प्लॅनचा मोफत प्रवेश मिळणार आहे. या ऑफरची किंमत प्रत्येकी सुमारे ₹35,100 आहे.
या प्लॅनअंतर्गत वापरकर्त्यांना Google Gemini 2.5 Pro, नवीनतम Nano Banana आणि Veo 3.1 मॉडेल्सचा वापर करून अधिक प्रभावी प्रतिमा आणि व्हिडिओ तयार करण्याची सुविधा मिळेल. शिक्षण आणि संशोधनासाठी Notebook LMचा विस्तारित वापर आणि 2 TB क्लाउड स्टोरेजसारख्या प्रीमियम सेवा देखील या ऑफरमध्ये समाविष्ट आहेत.
सुरुवातीला ही सुविधा १८ ते २५ वयोगटातील जिओ ग्राहकांसाठी खुली राहील, आणि पुढील टप्प्यात सर्व जिओ वापरकर्त्यांना उपलब्ध होईल. ही AI सेवा केवळ 5G अनलिमिटेड प्लॅन असलेल्या जिओ ग्राहकांसाठी लागू असेल. रिलायन्सच्या रिलायन्स इंटेलिजन्स लिमिटेड या सहाय्यक कंपनीने गूगलच्या सहकार्याने ही विशेष AI सेवा तयार केली आहे. प्रत्येक भारतीय ग्राहक, संस्था आणि डेव्हलपरला AI शी जोडणे हे उद्दिष्ट आहे.
ही भागीदारी रिलायन्सच्या “AI for All” या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन मुकेश डी. अंबानी म्हणाले की, आमचं ध्येय म्हणजे १.४५ अब्ज भारतीयांपर्यंत AI सेवा पोहोचवणे. गूगलसारख्या दीर्घकालीन भागीदारांसोबत आम्ही भारताला AI सक्षमच नाही, तर AI समर्थ बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत — जिथे प्रत्येक नागरिक आणि संस्था AIचा उपयोग करून प्रगती साधू शकेल.
गूगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई म्हणाले की, रिलायन्स आमच्यासाठी भारताच्या डिजिटल भविष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा भागीदार राहिला आहे. आता आम्ही ही भागीदारी AIच्या नव्या युगात घेऊन जात आहोत. ही पुढाकार गूगलच्या अत्याधुनिक AI साधनांना भारतातील ग्राहक, उद्योग आणि डेव्हलपर्सपर्यंत पोहोचवेल.
——————————————————-
जिओ ग्राहकांना १८ महिन्यांपर्यंत मिळणार Google AI Proचा मोफत ऍक्सेस
RELATED ARTICLES
Mumbai
haze
27
°
C
27
°
27
°
61 %
0kmh
0 %
Sun
27
°
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°

