कोल्हापूर :
गेल्या काही वर्षात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेल्या निधीतून ऐतिहासिक रंकाळा तलावाच्या सौंदर्यात भर पडली आहे. याची भुरळही कोल्हापूर वासियांसह पर्यटकांना पडत असून, रंकाळा तलावास भेट देणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासह खवय्यांचीही गर्दी होत आहे. या परिसरातील फेरीवाले याच उदरनिर्वाहावर अवलंबून असून, अधिकाऱ्यांनी समन्वय साधून अन्यायकारक कारवाई टाळावी. तसेच फेरीवाल्यांनीही सूट दिली म्हणून त्याचा गैरफायदा न घेता शिस्त पाळून अधिकाऱ्यांना सहकार्य करावे. रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच असल्याचे मत आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केले.
गेल्या दोन दिवसांपासून रंकाळा येथील संध्यामठ परिसरातील फेरीवाल्यांवर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईबाबत फेरीवाल्यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्याकडे दाद मागितली. या पार्श्वभूमीवर आ. क्षीरसागर यांनी संध्यामठ परिसरात भेट देवून फेरीवाले आणि अधिकारी यांच्यात समन्वय घडवून आणला.
यावेळी भागातील नागरिकांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमोर पार्किंग, वाहतुकीची कोंडी, कचरा उठावाबाबत मत व्यक्त केले. यावर आ. राजेश क्षीरसागर यांनी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्याशी संवाद साधून वाहतुकीची कोंडी होवू नये, अनधिकृत पार्किंग होवून नये यासाठी रंकाळा मेन रोड परिसरात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त नेमण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त रमाकांत अडसूळ यांच्याशी संपर्क साधून नव्याने होणाऱ्या शहर विकास आराखड्यात रंकाळा स्टँड ते फुलेवाडी आणि क्रशर चौक ते जावळाचा गणपती चौक असा जोड उड्डाणपूल प्रस्तावित करण्याच्या सूचना दिल्या. यासह मंजूर असलेल्या निधीतून रंकाळा परिसरात आवश्यक ठिकाणी ओला व सुका कचऱ्याचे गारबेज कलेक्टर तात्काळ बसविण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, कमलाकर जगदाळे, हर्षल सुर्वे, महानगरपालिका इस्टेट अधिकारी विलास साळोखे, पंडित पोवार, बंटी साळोखे, संग्राम जरग, कपिल साठे अजित साळोखे, शिवराज पोवार, संजय निगवेकर, काकाजी मोहिते, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
रंकाळ्याचे सौंदर्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच : आ. क्षीरसागर
Mumbai
smoke
28
°
C
28
°
26.9
°
51 %
3.6kmh
20 %
Thu
27
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

