कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू अभिषेक निषादची कर्नल सी. के. नायडु ट्राॅफीसाठी २३ वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा चारदिवशीय साखळी पध्दतीची असुन या स्पर्धेतील सामने दि १६ ऑक्टोबरपासून होणार आहेत. स्पर्धा महाराष्ट्र, सौराष्ट्र, तामिळनाडू मध्यप्रदेश, त्रिपुरा, पाॅंडेचरी, आंध्रप्रदेश, दिल्ली या राज्य संघामध्ये होणार आहे.
अभिषेक निषाद यापूर्वी सन २०१७-१८ मध्ये १४ वर्षाखालील महाराष्ट्र संघात व २०१९-२० या वर्षी १६ वर्षाखालील महाराष्ट्र संघात व सन २०१९-२०, १९ वर्षाखालील कुचबिहार स्पर्धेत महाराष्ट्र संघाकडुन खेळताना अभिषेक निषादने ७ सामन्यात ४४ विकेट घेत व भारतातील अव्वल गोलदांज ठरला. या कामगिरीच्या जोरावर त्याची राष्ट्रीय क्रिकेट ॲकॅडमीच्या (नॅशनल कॅम्प) कॅम्पसाठी निवड झाली होती. या कॅम्पसाठी निवड झालेला अभिषेक निषाद हा कोल्हापूरचा पहिलाच खेळाडू होता. अभिषेक १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघातून विनू मंकड ट्राॅफीसाठी सलग दोन वर्षे खेळला आहे. तसेच बीसीसीआय मार्फत दिला जाणारा सन २०२१-२२ एम. ए. चिदंबरम पुरस्कार भारतीय खेळाडू रविंद्र जडेजा यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले होते.
——————————————————-
अभिषेक निषादची कर्नल सी. के. नायडू ट्राॅफीसाठी महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24
°
C
24
°
24
°
50 %
2.1kmh
0 %
Sat
28
°
Sun
28
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°

