Homeशैक्षणिक - उद्योग घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा यशराज पाटील एनडीए परीक्षेत भारतात १८वा

घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा यशराज पाटील एनडीए परीक्षेत भारतात १८वा

कोल्हापूर :
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी यशराज पाटील याने राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) परीक्षा २०२५ मध्ये संपूर्ण भारताच्या क्रमवारीत १८वा क्रमांक मिळवत शाळेची आणि कोल्हापूरची मान उंचावली.
ही परीक्षा युपीएससीतर्फे १३ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आली होती. संपूर्ण भारतातून दोन लाख पन्नास हजार विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. इयत्ता बारावी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी या परीक्षेचे आयोजन केले जाते. लेखी परीक्षेत यशस्वी होत यशराजची मुलाखतीसाठी निवड झाली. त्यानंतर एसएसबी मुलाखत प्रयागराज येथे झाली. देशभरातील हजारो विद्यार्थ्यांमधून यशराजने लेखी परीक्षा व मुलाखतीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत देशात १८वा क्रमांक प्राप्त केला.
यशराज हा संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे. ११ वीमध्ये असताना त्याला अमेरिकन सरकारच्या YES स्कॉलरशिप कार्यक्रमातून एक वर्ष अमेरिकेत शिक्षण घेण्याची संधी मिळाली होती. लहानपणापासूनच त्याने एनडीएमध्ये जाण्याचे स्वप्न पाहिले होते.
राष्ट्रीय संरक्षण अकादमी पुणे ही भारतीय सैन्य, नौदल आणि वायुसेना या तिन्ही दलांसाठी संयुक्त प्रशिक्षण संस्था आहे. येथे प्रवेश मिळवणे हे देशातील अत्यंत कठीण आणि प्रतिष्ठेचे मानले जाणारे यश आहे. हे यश यशराजने कोणतेही क्लास अथवा अकॅडमीमध्ये न जाता स्वतः अभ्यास करून प्राप्त केले.
संस्थापक संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन, डे बोर्डिंग विभागाचे प्राचार्य अस्कर अली, ज्यु कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे व सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी यशराजचे अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
24 ° C
24 °
24 °
50 %
2.1kmh
0 %
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °
Tue
28 °
Wed
28 °

Most Popular

You cannot copy content of this page