Homeकला - क्रीडाअनिकेत जाधवचा केरळच्या कॅलिकट एफसीसोबत करार

अनिकेत जाधवचा केरळच्या कॅलिकट एफसीसोबत करार

कोल्हापूर :
केरळ सुपर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी भारताचा युवा आणि प्रतिभावान फुटबॉलपटू अनिकेत जाधवने कॅलिकट एफसीसोबत सहा महिन्यांचा करार केला आहे. हा करार रेकॉर्डब्रेक मानधनावर झाला असून, यामुळे अनिकेत या लीगचा नवा ‘स्टार प्लेयर’ ठरला आहे. हा करार अनिकेतच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अनिकेत जाधव याने केलेल्या कराराबद्दल कॅलिकट एफसीने आनंद व्यक्त केला आहे. केरळच्या फुटबॉल चाहत्यांसाठी ही एक मोठी आनंदाची बातमी असून, कॅलिकट एफसी संघामध्ये अनिकेतच्या येण्यामुळे संघाची ताकद वाढली असल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे. या हंगामात अनेक नामांकित खेळाडू आपापल्या संघांसाठी खेळत आहेत. यामध्ये रॉय कृष्णा, प्रशांत मोहन, आसिफ खान, लॅनी रॉड्रिग्स आणि सुमित राठी यांच्यासारख्या आयएसएलमधील अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व दिग्गजांसोबत अनिकेत जाधवचा सहभाग लीगमध्ये एक वेगळीच रंगत आणणार आहे.
केरळ सुपर लीगचा हा दुसरा हंगाम असून, फुटबॉलप्रेमींमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. वेगवेगळ्या संघांमध्ये खेळणाऱ्या या स्टार खेळाडूंसोबत अनिकेत जाधवची खेळी पाहणे रोमांचक ठरेल. अनिकेत जाधवचे फुटबॉल कौशल्य, वेग आणि आक्रमक खेळ यामुळे तो लवकरच केरळच्या फुटबॉल चाहत्यांचा लाडका खेळाडू बनेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
23 ° C
23 °
21.9 °
46 %
2.6kmh
4 %
Fri
27 °
Sat
27 °
Sun
28 °
Mon
29 °
Tue
29 °

Most Popular

You cannot copy content of this page