Homeकला - क्रीडाघोडावत इंटरनॅशनल स्कूलची अनन्या चव्हाण महाराष्ट्र अंडर-१९ क्रिकेट संघात

घोडावत इंटरनॅशनल स्कूलची अनन्या चव्हाण महाराष्ट्र अंडर-१९ क्रिकेट संघात

कोल्हापूर :
संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे येथे इयत्ता दहावीमध्ये शिकणारी विद्यार्थिनी अनन्या राहुल चव्हाण हिची महाराष्ट्र महिला अंडर-१९ संघात निवड झाली. बीसीसीआय अंतर्गत असणाऱ्या आंध्रप्रदेश क्रिकेट असोसिएशन अंडर-१९ महिला टी-२० आमंत्रित स्पर्धा २०२५-२६ मध्ये अनन्या महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
या क्रिकेट स्पर्धा सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात आंध्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेतील सर्व सामने एसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, मंगलगिरी (विजयवाडा) येथे होणार आहेत. अनन्या चव्हाणच्या या निवडीमुळे महाराष्ट्रातील युवा महिला क्रिकेट क्षेत्राला मोठी चालना मिळाली असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी अनन्या चव्हाण ही महिला महाराष्ट्र क्रिकेट प्रीमियर लीगमध्ये रायगड रॉयल्स संघाकडून खेळली आहे. महाराष्ट्रातील सर्वात तरुण अष्टपैलू खेळाडू म्हणून तिची ख्याती आहे.
अनन्या चव्हाण हिच्या निवडीबद्दल संस्थापक संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती, बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन, डे बोर्डिंगचे प्राचार्य अस्कर अली, क्रीडा संचालक आय. वाय. केंचन्नावर यांनी अभिनंदन करून स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28.9 °
28 °
78 %
5.1kmh
41 %
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
29 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page