कोल्हापूर :
एचआयव्ही एड्सला प्रतिबंध व जनजागृती करण्यासाठी महाविद्यालयीन युवक युवतींचा सहभाग मोलाचा आहे, असे प्रतिपादन पंचगंगा रुग्णालयाच्या आयसीटी समुपदेशिका सौ. सुरेखा जाधव यांनी केले. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई यांच्यावतीने विवेकानंद कॉलेज येथे विद्यार्थ्यांसाठी इंटेसिफाईड आयईसी कॅम्पेन अंतर्गत आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.
यावेळी सौ. सुरेखा जाधव यांनी बोलताना एचआयव्हीची कारणे, असुरक्षित लैगिक संबंध, दुषित सुईचा वापर, दुषित रक्ताचा वापर व आईकडून गर्भातील बाळाला संसर्गाचा धोका असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी उपलब्ध असलेल्या मोफत तपासणी व मोफत उपचाराबाबतही माहिती दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार हे होते. प्रास्ताविक व स्वागत राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. एच. जी. पाटील यांनी केले. आभार प्रा. सौ. एस. पी. पंचभाई यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन आरआरसी नोडल ऑफिसर मेजर सुनिता भोसले यांनी केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अंडर ऑफिसर सायली वडकर हिने केले.
यावेळी ज्युनि. सायन्स विभागप्रमुख प्रा. एम. आर. नवले, प्रा. एस. एल. पाटील, प्रा. एल. एस. नाकाडी, प्रा. सौ. पद्मजा पाटील, प्रा. शलाका मुठाणे व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, एनसीसी कॅडेट, एनएसएसचे स्वयंसेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रबंधक सचिन धनवडे व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
——————————————————-
एचआयव्ही एड्स जनजागृती मोहिमेत युवक युवतींचा सहभाग मोलाचा : सौ.सुरेखा जाधव
Mumbai
smoke
31
°
C
31
°
28.9
°
42 %
4.6kmh
5 %
Thu
29
°
Fri
26
°
Sat
25
°
Sun
26
°
Mon
27
°

