कोल्हापूर :
येथील विवेकानंद महाविद्यालयातील ज्युनिअर व सिनिअर एनएसएस विभाग मार्फत कसबा बावडा येथील पंचगंगा नदी घाट येथे घरगुती गौरी-गणपती विसर्जनावेळी गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन करण्यात आले.
घरगुती गणपती विसर्जनप्रसंगी नदीचे पाणी प्रदुषण व पर्यावरण हानी टाळण्यासाठी विवेकानंद कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व कार्यक्रम अधिकारी यांच्या मार्फत गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन करुन पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. विवेकानंद कॉलेजच्या मूर्तीदान आवाहनास कसबा बावड्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी संकलित केलेल्या मुर्ती महानगरपालिका प्रशासनाकडे सुपुर्द करण्यात आल्या.
या उपक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे अधिकारी प्रा. संदीप पाटील, प्रा. पी. आर. बागडे प्रा. ए. आर. धस, प्रा. सौ. एस. पी. वेदांते, प्रा. एल. ई. नरोन्हा यांनी केले. यावेळी स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कॉलेजचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे व प्रशासकीय कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
——————————————————-
विवेकानंदच्या एनएसएस विभागातर्फे गणेशमूर्ती व निर्माल्य संकलन
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
26.4
°
C
26.4
°
26.4
°
82 %
5.7kmh
100 %
Sun
27
°
Mon
28
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°