Homeकला - क्रीडाविवेकानंद कॉलेजला टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी विजेतेपद 

विवेकानंद कॉलेजला टेबल टेनिस स्पर्धेत दुहेरी विजेतेपद 

कोल्हापूर :
कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यावतीने संजीवन स्कूल हॉल रंकाळा येथे घेण्यात आलेल्या महानगरपालिकास्तर टेबल टेनिस स्पर्धेमध्ये विवेकानंद कॉलेजच्या १९ वर्षाखालील मुलांच्या व मुलींच्या संघाने विेजेतेपद मिळविले.
टेबल टेनिस स्पर्धेत मुलांच्या संघाने अंतिम सामन्यात न्यू हायस्कूल संघाचा २-० ने पराभव केला. मुलींच्या संघाने डी. वाय. पाटील कॉलेजचा २-० ने पराभव करीत विजेतेपद मिळविले.
विजेता मुलांचा संघ असा : ईशान सुभाष पटेल, केतन विनायक सुतार, वेदांत राजेंद्र पाटील, शिवम राजू गुप्ता, सोहम शिवकुमार चव्हाण.
विजेता मुलींचा संघ असा : निहाली निवास पाटील, माही पुष्कराज जनवाडकर, संस्कृती शैलेश थोरात, समीक्षा युवराज पोवार, समृद्धी संदिप हजारे.
या खेळाडूंना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, ज्युनिअर जिमखाना विभाग प्रमुख प्रा. संतोष कुंडले, जिमखाना विभाग प्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. समीर पठाण, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार एस. के. धनवडे व सुरेश चरापले यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
26.9 °
83 %
7.2kmh
7 %
Fri
30 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page