कोल्हापूर :
गणेशोस्तव राज्य महोत्सवांतर्गत गुरुवार, दि. ४ सप्टेंबर रोजी कोल्हापूरात ‘जल्लोष माय मराठीचा’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्याच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेत गणेशोत्सव हा अत्यंत लोकप्रिय आणि राज्याची देशविदेशात सांस्कृतिक ओळख निर्माण करून देणारा उत्सव असल्याने महाराष्ट्र शासनाने दि. १४ ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयाद्वारे गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा महसूल प्रशासनामार्फत गुरुवारी (दि. ४) सायंकाळी ६ ते ९ या कालावधीमध्ये ‘जल्लोष माय मराठीचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन, दसरा चौक कोल्हापूर येथे हा कार्यक्रम होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्व कोल्हापूरकरांनी हजेरी लावून उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कोल्हापूरात उद्या ‘जल्लोष माय मराठीचा’ सांस्कृतिक कार्यक्रम
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
27
°
C
27
°
24.9
°
28 %
2.6kmh
3 %
Sat
27
°
Sun
26
°
Mon
27
°
Tue
28
°
Wed
28
°

