• दोन लाख चार हजार चारशे एकवीस लोकांनी दिली स्वाक्षरी
कोल्हापूर :
नांदणी येथील स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठातील महादेवी हत्तीणीला पोलीस बंदोबस्तात गुजरातच्या वनतारामध्ये रवाना करण्यात आल्यानंतर आता लाडक्या महादेवीला परत आपल्या घरी आणण्यासाठी काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी स्वाक्षरी मोहीम सुरु केली होती. या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल सव्वा दोन लाखहून अधिक नागरिकांनी सहभाग घेत आपली महादेवी नांदणी मठातच राहिली पाहिजे असा संदेश यानिमित्ताने दिला आहे.
विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी सुरु केलेल्या या स्वाक्षरी मोहिमेला कोल्हापुरकरांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. शनिवारी सकाळी ही पत्रे माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी नांदणी येथील मठात महास्वामीजी यांच्या हस्ते स्वाक्षरी केलेल्या या सर्व फॉर्मचे पूजन करण्यासाठी रवाना झाले. दुपारी १ वाजता रमणमळा पोस्ट ऑफिस, कोल्हापूर येथून हे सर्व फॉर्म आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत भारताच्या राष्ट्रपती महामहीम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात येणार आहेत.
माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह कार्यकर्ते नांदणी गावात दाखल झाले आहेत. या ठिकाणी महास्वामीजी यांच्या हस्ते पत्रांची पूजन करून पोस्ट कार्यालयाकडे जाणार आहेत.
आणू महादेवीला घरी…
Mumbai
broken clouds
27.3
°
C
27.3
°
27.3
°
80 %
3.9kmh
84 %
Sun
29
°
Mon
29
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
28
°