कोल्हापूर :
भविष्यातील कोल्हापूरची गरज ओळखुन सुरू केलेली ‘ललित गांधी इंटरनॅशनल स्कूल’ ही कोल्हापूरच्या शैक्षणिक विश्वातील नव्या अध्यायाची सुरूवात असेल असे प्रतिपादन महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले. संस्थेतर्फे मेट्रो लाईफ सिटी या अत्याधुनिक टाऊनशीपमध्ये उभारण्यात आलेल्या ‘ललित गांधी इंटरनॅशनल स्कूल’च्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी संस्थेचे सचिव महेश सामंत, महावीर स्कूल (माध्यमिक)च्या मुख्याध्यापिका धनश्री व्हनागडे, ब्लॉसम प्ले स्कूलच्या मुख्याध्यापिका निलम जाधव, महावीर स्कूल (प्राथमिक)च्या मुख्याध्यापिका विद्या सरमळकर, नवीन शाळेच्या डायरेक्टर मुक्ती ओसवाल, सौ. जया गांधी, हर्षिता भंडारी, भक्ती कटारीया, अॅड. मेघ गांधी, सौ. अनिता गांधी आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न झाला.
ललित गांधी पुढे म्हणाले की, ३३ वर्षापूर्वी पहिली शाळा सुरू करताना सुसंस्कारासह दर्जेदार शिक्षण देण्याचे जे सेवाव्रत स्विकारले होते त्याच भावनेने आज सहावी शाळा सुरू करीत आहोत. ही शाळा इंटरनॅशनल स्कूल श्रेणीमध्ये सुरू करण्यामागची प्रेरणा इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती आहेत. कोल्हापूरात आय.टी. क्षेत्रासह सर्वांगिण विकास अपेक्षित असेल तर अन्य सुविधांसह दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली होती. त्यांना अपेक्षित गुणवत्तेचा दर्जा, क्रीडा सुविधांसह परिपुर्ण अशी इंटरनॅशनल स्कूल बनविण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत अशी ग्वाही ललित गांधी यांनी याप्रसंगी दिली.
सुसंस्कारासह गुणवत्तापुर्ण शिक्षणाबरोबरच, फुटबॉल, क्रिकेट, बास्केटबॉल, बॅडमिंटन, टेनिस आदी सर्व प्रकारच्या क्रीडा प्रशिक्षणाची सोय उपलब्ध केल्याचेही ललित गांधी यांनी सांगितले.
इंटरनॅशनल स्कूलच्या डायरेक्टर सौ. मुक्ती प्रशम ओसवाल यांनी स्वागत व आभार प्रदर्शन केले.
ललित गांधी इंटरनॅशनल स्कूल’चा शुभारंभ
RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
27.4
°
C
27.4
°
27.4
°
82 %
5.5kmh
84 %
Sat
27
°
Sun
27
°
Mon
27
°
Tue
27
°
Wed
27
°