Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून विविध गावात वृक्षारोपण

डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून विविध गावात वृक्षारोपण

कोल्हापूर :
         डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे येथे जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त ग्रामीण कृषी कार्यानुभव अभियानाअंतर्गत महाविद्यालयाचे कृषीदूत व कृषीकन्या यांनी वाळवा व मिरज तालुक्यातील एकूण ११ गावामध्ये वृक्षारोपण करून तेथील शेतकरी व ग्रामस्थ यांच्यासाठी पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम घेतले.
         कृषी महाविद्यालयाच्या परिसरात प्रा. डी. एन. शेलार यांच्या हस्ते वृक्षारोपण केले. त्यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य शेलार म्हणाले, पर्यावरणाचे संवर्धन करण्याची जवाबदारी या पृथ्वी वरच्या प्रत्येक व्यक्तीची आहे. प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्यांचे संगोपन केले पाहिजे. सर्वांनी पर्यावरण रक्षणासाठी जर सकारात्मक पाऊल उचलले तर नक्कीच भविष्यात आपल्याला बदल पाहायला मिळेल.
          पर्यावरण सप्ताहानिमित्त वाळवा तालुक्यातील शिगांव, बागणी, गोटखिंडी, बावची, कारंदवाडी, मिरजवडी तसेच मिरज तालुक्यातील तुंग, समडोळी, कवठेपिरान व दूधगाव आदी गावात कार्यरत असलेल्या कृषीदूत व कृषीकन्यानी २५० पेक्षा जास्त वनवृक्ष लावले. या सर्व रोपांचे ग्रामस्थांनी संवर्धन करावे असे आवाहन त्यानी केले.
महाविद्यालयातील कार्यक्रमाचे आयोजन प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यानी केले होते. त्यावेळी त्यांनी पर्यावरण दिनानिमित विविध कविता व पोस्टर्सचे सादरीकरण केले.
        कार्यक्रमाला अकॅडमिक प्रमुख प्रा. आर. आर. पाटील, सर्व विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
        संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28.3 ° C
28.3 °
28.3 °
79 %
6.7kmh
98 %
Fri
28 °
Sat
28 °
Sun
29 °
Mon
28 °
Tue
28 °

Most Popular

You cannot copy content of this page