कोल्हापूर :
डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीचे कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथे महिला शेतकऱ्यासाठी दोन दिवसीय ‘पंचगव्य उत्पादने निर्मिती’ प्रशिक्षण संपन्न झाले. नैसर्गिक शेतीसोबतच शेतकऱ्यांना पूरक जोडव्यवसाय उपलब्ध व्हावा, या उद्देशाने हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा कोल्हापूर आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली पुरस्कृत कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या प्रशिक्षणात गाईच्या पंचगव्यापासून विविध मूल्यवर्धित वस्तू तयार करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने धूपकांडी, अगरबत्ती, साबण, ओम-श्री-स्वस्तिक, शुभ-लाभ, गोमय गणेशमूर्ती, पणती, तुळशी वृंदावन, अमृतधारा आणि हवन गोवऱ्या इत्यादी वस्तू तयार करण्यात आल्या. यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. अंकुश माळुंगेकर आणि गव्यसिद्ध नितीन जंगम यांनी सखोल मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवासाठी औदुंबर (सांगली) येथील सुहास पाटील यांच्या ‘गोपालनंदन ऑरगॅनिक’ प्रकल्पाला भेट देण्यात आली. यावेळी पाटील यांनी सेंद्रिय गूळ निर्मिती, गुऱ्हाळ घर व्यवस्थापन तसेच गो-विज्ञान आणि पंचगव्य संशोधन याबाबत सविस्तर माहिती दिली.
या प्रशिक्षण कार्यक्रमात पन्हाळा तालुक्यातील केखले व आसपासच्या गावांमधील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे येथील गृहविज्ञान विभाग विषय विशेषज्ञ प्रा. दिपाली मस्के यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. आत्मा कोल्हापूरच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे व कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख जयवंत जगताप यांचे सहकार्य लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
——————————
डी. वाय. पाटील कृषी विज्ञान केंद्रात पंचगव्य उत्पादन प्रशिक्षण संपन्न
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
31
°
C
31
°
28.9
°
55 %
3.6kmh
4 %
Mon
30
°
Tue
30
°
Wed
30
°
Thu
30
°
Fri
29
°

