कोल्हापूर :
संघांच्या नियोजनासाठी संपूर्ण फुटबॉल हंगामातील कार्यक्रम जाहीर करा, १३,१५ व १७ वयोगटातील मुला-मुलींच्या स्पर्धा आयोजित करा, ज्येष्ठांना सामने पाहण्यासाठी सवलत द्या यासह विविध मागण्या कोल्हापूर शहर-जिल्हा नागरी कृती समितीतर्फे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन (केएसए) कडे करण्यात आल्या. १ डिसेंबर रोजी सुरु होणाऱ्या फुटबॉल हंगामाच्या पार्श्वभूमीवर हे निवेदन केएसएचे सचिव माणिक मंडलिक यांना देण्यात आले.
फुटबॉल हंगामाच्या स्पर्धेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करावा जेणेकरून फुटबॉल संघनाही आर्थिकदृष्ट्या सोयीचे होईल. नवोदित खेळाडू तयार व्हावेत यासाठी फिफाच्या नवीन नियमानुसार १३, १५ व १७ वर्षाखालील मुले व मुलींच्या स्पर्धांचे आयोजन करावे. त्यामुळे स्थानिक संघांना नवनवीन खेळाडू मिळतील. ज्येष्ठ नागरिकांना स्पर्धा पाहण्यासाठी सवलत व पासची सुविधा द्यावी अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळात अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत सूर्यवंशी, अच्युतराव साळुंखे, सुनील मोहिते, बाबासाहेब पोवार, चंद्रकांत पाटील, आप्पासाहेब साळोखे, प्रभाकर पाटील, नारायण खुपेरकर, अनंत पाटील, महेश जाधव, राजाभाऊ मालेकर, फिरोज सरगुर, बाबासो महालकरी, रामभाऊ देवणे, संजय जांभळे आदींचा समावेश होता.
——————————
फुटबॉल हंगामासंदर्भात नागरी कृती समितीचे केएसएला विविध मागण्यांचे निवेदन
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26
°
C
26
°
26
°
53 %
1.5kmh
0 %
Sat
26
°
Sun
27
°
Mon
29
°
Tue
31
°
Wed
30
°

