Homeइतरअमृत योजनेच्या नवीन पाईपलाईनवर नळ कनेक्शन स्थलांतरित करा

अमृत योजनेच्या नवीन पाईपलाईनवर नळ कनेक्शन स्थलांतरित करा

• २३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत कनेक्शन स्थलांतरित करण्याची मुदत
कोल्हापूर :
नवीन पाईपलाईन कार्यान्वित झालेल्या भागांमध्ये जुन्या व खराब पाईपलाईन बंद करणे आवश्यक आहे. तसेच जुन्या पाईपलाईनवरील नळ कनेक्शन नवीन पाईपलाईनवर स्थलांतरित करणे गरजेचे आहे. त्यामुळे ज्या भागांमध्ये नवीन व जुनी पाईपलाईन सुरू आहे, त्या ठिकाणी आता केवळ नवीन पाईपलाईनमधूनच पाणीपुरवठा सुरू ठेवण्यात येणार असून जुनी पाईपलाईन बंद करण्यात येणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत शहर पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. या योजनेअंतर्गत विविध भागांत नवीन पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. काही भागांमध्ये नवीन व जुन्या अशा दोन्ही पाईपलाईनमधून पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांना अपेक्षित दाबाने पाणी मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी ज्या नळ कनेक्शनधारकांनी अद्याप आपले कनेक्शन नवीन पाईपलाईनवर स्थलांतरित केलेले नाही, त्यांनी दि. २३ नोव्हेंबर २०२६ ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत स्वखर्चाने नवीन पाईपलाईनवर कनेक्शन स्थलांतरित करून घ्यावे.
निर्धारित मुदतीनंतर जुनी पाईपलाईन बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत नळ कनेक्शन नवीन पाईपलाईनवर स्थलांतरित न केल्यास जुनी पाईपलाईन बंद झाल्यानंतर संबंधित नळ कनेक्शनला पाणीपुरवठा होणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
तरी नागरिकांनी दिलेल्या मुदतीत आपले नळ कनेक्शन अमृत योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या नवीन पाईपलाईनवर स्वखर्चाने स्थलांतरित करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26 ° C
26 °
26 °
53 %
1.5kmh
0 %
Sat
26 °
Sun
27 °
Mon
29 °
Tue
31 °
Wed
30 °

Most Popular

You cannot copy content of this page