• महानगरपालिका प्रशासनाच्या आढावा बैठकीत विविध विकासकामांचा घेतला आढावा
कोल्हापूर :
विकासकामांना होणारा विलंब आणि अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी कारणे याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आ. राजेश क्षीरसागर यांनी दिला.
शहरातील प्रलंबित विकासकामे, नागरिकांचे प्रश्न आणि महानगरपालिका प्रशासनाच्या विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाची बैठक घेतली. या बैठकीत झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड, मनपा गाळेधारकांचे प्रश्न, अनधिकृत बांधकाम, विविध स्मारके, पार्किंग व्यवस्था, क्रीडा सुविधा, उद्याने, जलतरण तलाव, तसेच शहरातील सुरू असलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विकासकामांना होणारा विलंब आणि अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी कारणे याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
बैठकीत प्रत्येक विषयावर चर्चा होऊनही प्रत्यक्ष कामात प्रगती होत नसल्याबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांनी नाराजी व्यक्त केली. मागील बैठक आणि आजच्या बैठकीत काहीच फरक दिसत नाही, असे सांगत प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त तयार करावे. बैठकीत ज्या कामांबाबत चर्चा झाली आणि जे निर्णय घेण्यात आले, त्यांचा संबंधित अधिकाऱ्यांनी नियमित पाठपुरावा करून कामे पूर्ण करावीत, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, नगरसेवक अजय इंगवले, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, शहर अभियंता रमेश मस्कर, उपायुक्त धनवडे, परितोष कंकाळ, नागेंद्र मुतकेकर, सहाय्यक संचालक प्रशांत भोसले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, आशपाक आजरेकर, नेपोलियन सोनुले आदी उपस्थित होते.
——————————
विकासकामांना विलंब खपवून घेणार नाही : आमदार राजेश क्षीरसागर
Mumbai
smoke
26
°
C
26
°
26
°
53 %
1.5kmh
0 %
Sat
26
°
Sun
27
°
Mon
29
°
Tue
31
°
Wed
30
°

