• मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून ए. आय. तंत्रज्ञानाचा गौरव
कोल्हापूर :
ऊस शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर अपरिहार्य आणि काळाची गरजच बनत चाललेला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या करनूर (ता. कागल) येथील फोंड्या माळरानावरील शेतीमध्ये ए. आय. च्या जोरावर एकरी तब्बल ९० टन ऊस उत्पादन मिळाले आहे. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी शेतावर शिवार फेरी करून पाहणी केली.
यावेळी श्री. मुश्रीफ यांनी ए. आय. तंत्रज्ञानाचा गौरव केला. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्यावतीने दोन हजार एकरांमध्ये ए. आय. चा वापर करण्याचा निर्धार आहे. त्यापैकी अडीचशे एकरांवर हा प्रकल्प सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
श्री. मुश्रीफ म्हणाले की, आजमितीला कोल्हापूर जिल्ह्यातील एकरी उत्पादन सरासरी २५ टन आहे. ऊस उत्पादनातील ही घट शेतकऱ्याला न परवडणारी आहे. निव्वळ ऊसदर वाढवून ऊसशेतीचे अर्थकारण टिकणार नाही. त्यावर इलाज म्हणून उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन, सुविधा आणि सहकार्यही करणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी राज्य सरकारच्यावतीने एक हजार कोटींची तरतूदही करून ठेवली आहे. बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र, पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मायक्रोसॉफ्ट कंपनी आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना या चार संस्थांच्या समन्वयातून ऊस शेतीसाठी आणि पर्यायाने ऊसकरी शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी साकारलेला ऊसउत्पादन वाढीचा हा शेवटचा पर्याय वरदान ठरेल, असा विश्वास मंत्री श्री. मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, २५ वर्षांपूर्वी माळरानाची ही शेती अवघ्या एकरी दहा हजार रुपये दराने विकत घेतली होती. त्यानंतर खडकाळ फोंड्या माळरानामध्ये माती सोडून ठिबक सिंचनाने ओलिताखाली आणली. यापूर्वीचे ऊस उत्पादन एकरी ३५ ते ४० टन होते. ए. आय. च्या वापराने ते माळरानातही ९० टनावर आले आहे. मी शेती करीत असल्यापासून माझ्या आयुष्यातील ए. आय. मुळे आलेले हे सर्वात जास्त उत्पादन आहे, असेही ते म्हणाले.
बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ संशोधक डॉ. तुषार जाधव म्हणाले, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्यावतीने कार्यक्षेत्रात ऊस शेतीमध्ये एआयच्या वापराचे नियोजन अतिशय नियोजनबद्ध व तंतोतंत सुरू आहे. ए. आय. तंत्रज्ञानाचा वापर आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू अशा तिन्ही हंगामात कारखान्यामार्फत सुरू आहे. फोंड्या माळाच्या हलक्या जमिनी, मध्यम जमिनी आणि चांगल्या प्रतीच्या जमिनी, अशा तिन्ही प्रकारच्या जमिनीत हा प्रयोग सुरू आहे. एकापेक्षा जास्त विविध ऊसजातींच्या माध्यमातून हा प्रयोग सुरू आहे. त्याचे परिणाम दुपटीहून अधिक ऊस उत्पादन वाढीमध्ये येत आहेत.
ऊस शेतीतील ए. आय. तंत्रज्ञानामुळे फोंड्या माळावर एकरी ९० टन उत्पादन
RELATED ARTICLES
Mumbai
smoke
26
°
C
26
°
26
°
53 %
1.5kmh
0 %
Sat
26
°
Sun
27
°
Mon
29
°
Tue
31
°
Wed
30
°

