Homeराजकियकौस्तुभ गावडे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचा जाहीर पाठिंबा

कौस्तुभ गावडे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाचा जाहीर पाठिंबा

कोल्हापूर :
पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष-महायुतीचे अधिकृत उमेदवार शिक्षकमित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाने जाहीर पाठिंबा दिला.
शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावी व्यासपीठ मिळावे, तसेच जुनी पेन्शन योजनेच्या मागणीला बळ मिळावे, या दृष्टीने या पाठिंब्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे यांच्या जाहीरनाम्यातील पहिल्याच विषयाशी संबंधित जुनी पेन्शन समन्वय संघटनेने पाठिंबा दिल्याने त्यांची ताकद वाढली आहे.
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, खासदार धैर्यशील पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार भीमराव तापकीर, संजय जगताप, निवडणूक सहप्रमुख डॉ. प्रशम कोल्हे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपदादा कुंद यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पाठिंबा जाहीर करण्यात आला.
याप्रसंगी सुभाष माने, तानाजी माने, नंदकुमार सागर, प्रसाद गायकवाड, संजयकुमार झांबरे, सचिन नलवडे, दत्ता पाटील, बाबा पाटील, संदेश राऊत, विजय येवले, सुधाकर जगदाळे, शशिकांत शिंदे, रामचंद्र मोहिते, भरत मोजर , देविदास कठाळे आणि दत्तात्रय घुगरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना शिक्षकमित्र कौस्तुभ गावडे म्हणाले की, जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी सातत्याने लढा देणाऱ्या शिक्षक आणि कर्मचारी बांधवांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला, ही माझ्यासाठी आनंदाची बाब असून त्याचबरोबर मोठी जबाबदारीही आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. जुनी पेन्शन हा केवळ निवृत्तीनंतरच्या आर्थिक लाभाचा विषय नसून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाचा प्रश्न आहे.
ते पुढे म्हणाले की, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ शिक्षणव्यवस्थेच्या उभारणीसाठी समर्पित केलेला असतो. त्यांच्या भविष्याची सुरक्षितता सुनिश्चित होणे आवश्यक आहे. जुनी पेन्शन योजनेच्या मागणीबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी संबंधित घटकांशी संवाद साधून प्रभावी पाठपुरावा करण्याचा माझा प्रयत्न राहील. शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या भावनांचा आदर राखून त्यांच्या मागण्या योग्य त्या व्यासपीठावर मांडण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही दिली.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
scattered clouds
28.5 ° C
28.5 °
28.5 °
67 %
3kmh
41 %
Sun
28 °
Mon
32 °
Tue
31 °
Wed
31 °
Thu
31 °

Most Popular

You cannot copy content of this page