Homeशैक्षणिक - उद्योग डॉ. संदीप वाटेगावकर यांना राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

डॉ. संदीप वाटेगावकर यांना राष्ट्रीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

कोल्हापूर :
वाई येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक तथा रिसर्च डायरेक्टर डॉ. संदीप राजाक्का भास्कर वाटेगावकर यांना अविष्कार फाउंडेशन, इंडिया या संस्थेचा प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य हौसिंग फायनान्स, मुंबई च्या संचालिका व जिल्हा परिषद सदस्या वृषाली चव्हाण यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. डॉ. वाटेगावकर यांनी हा पुरस्कार पत्नी प्राजक्ता आणि कन्या सई यांच्यासमवेत स्वीकारला. यावेळी अविष्कार फाउंडेशन, इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
डॉ.वाटेगावकर यांच्या संशोधनाला भारत, जर्मनी व युके सरकारची मिळून ६  पेटंट प्राप्त झाले असून त्यांना अमेरिकेच्या स्कॉलर जीपीएस संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात जागतिक शात्रज्ञांच्या यादीत स्थान मिळाले आहे. डॉ. वाटेगावकर यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, त्यांचे ५० हून अधिक संशोधनपर शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. तसेच, त्यांनी ३० हून अधिक आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदांमध्ये आपल्या संशोधनाचे सादरीकरण केले आहे. त्यांच्या संशोधनकार्याची दखल घेऊन अमेरिका, दक्षिण कोरिया, इंग्लंड, स्वित्झर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्स या देशांमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांना वक्ता म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील लौकिकात भर पडली आहे.
या पुरस्काराबद्दल जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार नारायणराव चौधरी, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य प्रा. (डॉ.) विनोद वीर, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
29.3 ° C
29.3 °
29.3 °
64 %
2.5kmh
100 %
Sat
29 °
Sun
31 °
Mon
31 °
Tue
31 °
Wed
31 °

Most Popular

You cannot copy content of this page