• घोडावत शैक्षणिक संकुलात व्यवसाय व उद्योग विकास मंचचा ‘संवाद यशाचा’ उपक्रम
कोल्हापूर :
संजय घोडावत शैक्षणिक संकुलन आणि व्यवसाय व उद्योग विकास मंचच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘संवाद यशाचा’ या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध वक्ते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत यश, आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास, करिअर निवड आणि संकटांवर मात करण्याबाबत प्रभावी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास व्यवसाय व उद्योग विकास मंचचे संचालक महेश सारडा, राजेश शहा, अरुण शहा, युवराज शहा, निकुंज, अमित माटे, सचिव तथा संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांची उपस्थिती होती. शैक्षणिक संकुलातील मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
व्यवसाय व उद्योग विकास मंचाचे सचिव तथा संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांनी प्रास्ताविक केले. शैक्षणिक क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील संवाद अधिक दृढ व्हावा, विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधी व आव्हानांची माहिती मिळावी आणि विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत उद्योगाभिमुख दृष्टिकोन विकसित करावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. बानगुडे पाटील म्हणाले की, संजय घोडावत नाम ही काफी है. आपण स्वतः किती उंचीवर पोहोचलो याला फारशी किंमत नाही; आपण किती लोकांना त्या उंचीपर्यंत पोहोचवले, हीच खरी उंची आहे. संजय घोडावत यांचे स्वतःच्या यशासोबत इतरांच्या प्रगतीत योगदान देणे हेच जीवनातील खरे यश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मानवी व्यक्तिमत्त्वातील क्षमतांवर भाष्य करताना त्यांनी विद्यार्थ्यांना स्वतःला ‘मला आयुष्यात काय बनायचे आहे?’ हा प्रश्न विचारण्याचे आवाहन केले. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी वेगळे करण्याची क्षमता असते. डॉक्टर, अभियंता, वकील, क्रिकेटपटू, अभिनेता, शास्त्रज्ञ किंवा उद्योजक होण्याची स्वप्ने पाहताना स्वतःची आवड, क्षमता आणि कौशल्ये ओळखणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. करिअर निवडताना इतरांचे अनुकरण न करता स्वतःची आवड, क्षमता, कौशल्ये आणि भविष्यातील ध्येय यांचा विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोहन तिवडे यांनी केले तर महेश सारडा यांनी आभार मानले.
——————————
स्वतःवर विश्वास ठेवा, मोठी स्वप्ने पाहा : प्रा. नितीन बानगुडे
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
30.2
°
C
30.2
°
30.2
°
63 %
3.5kmh
22 %
Sat
30
°
Sun
30
°
Mon
30
°
Tue
29
°
Wed
30
°

