कोल्हापूर :
भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आयसीएआर), नवी दिल्लीतर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील पदव्युत्तर प्रवेश परीक्षेत (आयसीएआर-पीजी) तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देदिप्यमान यश संपादन केले आहे. राष्ट्रीय पातळीवरील या स्पर्धात्मक परीक्षेत महाविद्यालयाच्या चार विद्यार्थ्यानी गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे.
या राष्ट्रीय परीक्षेत दीपक समाधान शिंदे याने ॲग्रिकल्चरल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी विषयात देशात ४१वा क्रमांक पटकावला असून, ओबीसी प्रवर्गात तो १८ व्या क्रमांकावर आहे. प्रणव दिलीप पाटील याने देशात ३४८वे तर ईडब्ल्यूएस प्रवर्गात ४०वे स्थान मिळवले. दीक्षा तानाजी मगदूम हिने देशात ४२९वा तर ईडब्ल्यूएस प्रवर्गात ४४वा क्रमांक मिळवला असून वरुण अजित पाटील याने देशात ५१७ वा क्रमांक मिळवला आहे.
प्राचार्य प्रा. डॉ. सुहास पाटील यांनी या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामागे महाविद्यालयातील दर्जेदार शैक्षणिक वातावरण आणि सुनियोजित मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. संशोधन क्षेत्रात कार्यरत माजी विद्यार्थी आणि सध्या शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्यातील उत्तम नेटवर्किंग, वरिष्ठ विद्यार्थ्यांच्या व्याख्यानमाला आणि पदव्युत्तर परीक्षांसाठी वर्षभर राबवली जाणारी ‘टेस्ट सीरीज’ यामुळे विद्यार्थ्यांना या कठीण राष्ट्रीय स्पर्धा परीक्षांची तयारी करणे सुलभ झाले. नियमित मार्गदर्शन आणि योग्य दिशा यामुळे आमचे विद्यार्थी दरवर्षी अशा सर्वोच्च परीक्षांमध्ये यशस्वी होतात.
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील तसेच कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुहास पाटील, उपप्राचार्य पी. डी. उके यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
——————————
डी. वाय. पाटील कृषी अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांचे आयसीएआर परीक्षेत यश
RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
30.2
°
C
30.2
°
30.2
°
63 %
3.5kmh
22 %
Sat
30
°
Sun
30
°
Mon
30
°
Tue
29
°
Wed
30
°

