कोल्हापूर :
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनची (केएसए) ८६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी केएसए येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
संस्थेचे पेट्रन-इन-चीफ व खासदार श्री. शाहू छत्रपती महाराज यांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष श्री. मालोजीराजे छत्रपती यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून सभेच्या कामकाजास सुरुवात केली.
सभेच्या प्रारंभी अहवाल वर्षात दिवंगत झालेल्या देशातील थोर व्यक्ती, भारतमातेच्या सेवेसाठी शहीद झालेले जवान, संस्थेचे लाइफ मेंबर्स, क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडू, हितचिंतक तसेच ज्ञात-अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पेट्रन-इन-चीफ खासदार श्री. शाहू छत्रपती महाराज यांचे स्वागत अध्यक्ष श्री. मालोजीराजे छत्रपती यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. यानंतर त्यांनी पेट्रन मेंबर्स, उपाध्यक्ष, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य, कार्यकारिणी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य तसेच सभासदांचे स्वागत केले.
अध्यक्षीय भाषणात केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी, संस्थेच्या फुटबॉल स्पर्धांसह विविध क्रीडा उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच लॉन टेनिस, क्रिकेट, जिम्नॅस्टिक्स, टेबल टेनिस आदी विभागांमध्ये झालेल्या स्पर्धांचा उल्लेख करून राज्य व राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन केले. संस्थेच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सुरू असलेल्या विविध प्रयत्नांचीही त्यांनी माहिती दिली.
सभेत संस्थेचा वार्षिक अहवाल, ऑडिटर्स रिपोर्ट, ताळेबंद, नफा-तोटा पत्रक तसेच २०२६-२७ चे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. संस्थेच्या उपाध्यक्षपदी अरुण नरके, मानसिंग जाधव व मारुती उर्फ बाळ निचिते यांची निवड करण्यात आली. तसेच ऑडिटर म्हणून अमोल पवार यांची नियुक्ती करण्यात आली.
सभेच्या समारोपावेळी ऑन. जॉईंट जनरल सेक्रेटरी प्रा. अमर सासने यांनी संस्थेच्या विविध क्रीडा उपक्रमांच्या आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सब-कमिटी सदस्यांचे, देणगीदार व विविध संस्थांचे, सभासद, संघ, खेळाडू, पंच, वृत्तपत्रे, पोलीस प्रशासन तसेच कार्यालयीन कर्मचारी व अन्य सहकाऱ्यांचे केएसएच्या वतीने आभार मानले.
——————————
केएसएची ८६वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
Mumbai
few clouds
30.2
°
C
30.2
°
30.2
°
63 %
3.5kmh
22 %
Sat
30
°
Sun
30
°
Mon
30
°
Tue
29
°
Wed
30
°

