Homeकला - क्रीडारग्बी स्पर्धेत गर्ल्स हायस्कूल विजेते

रग्बी स्पर्धेत गर्ल्स हायस्कूल विजेते

कोल्हापूर :
महापालिकेच्या महात्मा फुले विद्यालय येथे झालेल्या मनपा स्तरीय १७ वर्षांखालील मुलींच्या रग्बी स्पर्धेत शिवाजी पेठ येथील गर्ल्स हायस्कूलच्या संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गर्ल्स हायस्कूलच्या संघाने राजार्षी शाहू विद्यालयाच्या संघाचा १५-० असा एकतर्फी पराभव केला. अंतिम सामन्यात व. ज. देशमुख इंग्लिश मीडियम स्कूलच्या संघाविरुद्ध चुरशीच्या लढतीत गर्ल्स हायस्कूलने १०-५ असा विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले.
विजेत्या संघात जिवीका गायकवाड, जान्हवी शिर्के, अंकिता मोहिते, आराध्या मिठारी, मंजिरी लाड, आराध्या चव्हाण, राजनंदिनी शेळके, दीपली कदम, आर्या टेळके, स्वराली लाड, स्वरा चव्हाण, आराध्या चव्हाण आणि पूर्वा धनवडे यांचा समावेश होता.
विजयी संघाला श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एच. एच. गोसावी यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच क्रीडा शिक्षिका सौ. उज्ज्वला देसाई आणि दीपक पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले.

RELATED ARTICLES
Mumbai
clear sky
29.4 ° C
29.4 °
29.4 °
56 %
6.2kmh
0 %
Mon
29 °
Tue
31 °
Wed
30 °
Thu
30 °
Fri
30 °

Most Popular

You cannot copy content of this page