कोल्हापूर :
दसरा दिवाळी जवळ येताच कोल्हापूरच्या जनतेला वेध लागतात ते ‘यामिनी’ या प्रदर्शनाचे. रोटरी क्लब ऑफ गार्गीजने यावर्षी हे प्रदर्शन दि. २६, २७ आणि २८ सप्टेंबर २०२६ रोजी मेघमल्हार हॉल, सयाजी हॉटेल, कोल्हापूर येथे आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन शनिवारी (दि.२६) दुपारी ४ वाजता महापौर सौ. रूपराणी निकम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सौ. अरुंधती महाडिक उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्षा सौ. सविता पदे, यामिनी चेअरमन डॉ. हेमलता कोटकर, सचिव सौ. सीमा मलानी, सौ. साधना घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यामिनी प्रदर्शनाचे हे तेरावे वर्ष असून यावर्षी प्रदर्शनात एक्स्क्लुझिव्ह रिअल ज्वेलर्स विथ युनिक डिझाईन्स, पोल्की, रिअल डायमंड्स, लॅबग्रोन डायमंड्स, संपूर्ण भारतामधील तसेच मुंबई, पुणे, सुरत, इंदोर, जयपूर, गोवा, बेंगलोर, दिल्ली येथील विविध प्रकारच्या होम डेकोर्स फॉर फेस्टिव्हल्स स्टॉल्स असे ११५ हुन अधिक स्टॉल्स आहेत.
आजपर्यंत रोटरी क्लब ऑफ गार्गीजने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. अनेक गरजूंना मदत केली आहे. शिवाय समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची उमेद देणे हा मुख्य उद्देश प्रदर्शनाचा असतो. त्यामुळे बचत गट यांनीही बनविलेल्या वस्तू प्रदर्शनात बघायला मिळणार आहेत. या प्रदर्शनातून उपलब्ध निधीतून विविध सामाजिक उपक्रम, महिला सबलीकरण, गरजूंसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, मुलींसाठी सर्वाइकल कॅन्सरचे वैक्सीन, पोलिओ मुक्तीसाठी रोटरी समूहाचा सिंहाचा वाटा आहे. महिलांसाठी उपयुक्त असणारी माहिती मिळावी यासाठी चर्चासत्र आयोजित केले जातात. सामाजिक भान ठेऊन सामजिक प्रकल्प राबविण्यावर अधिक भर दिला जातो. अशा विविध उपक्रमासाठी हा निधी वापरला जातो. शिवाय कॅन्सर सेंटरलाही मशिनरी दिलेली आहे, त्याचा उपयोग हॉस्पिटलमध्ये कॅन्सर रुग्णांना होत आहे. स्वयंम, अंकुर, तनिष्क, चेतना या शाळेतील मुलांसाठीही स्टॉल देण्यात आले आहेत.
हे प्रदर्शन २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ ते रात्री ९ आणि २७ व २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत सुरू राहणार आहे. तरी सर्व कोल्हापूरवासीयांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गार्गीजच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
——————————
रोटरी क्लब ऑफ गार्गीजचे “यामिनी” प्रदर्शन शनिवारपासून
Mumbai
overcast clouds
28.1
°
C
28.1
°
28.1
°
82 %
3kmh
100 %
Tue
28
°
Wed
30
°
Thu
29
°
Fri
28
°
Sat
28
°

