Homeकला - क्रीडाइंटर झोनल टेबल टेनिस स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम

इंटर झोनल टेबल टेनिस स्पर्धेत विवेकानंद कॉलेज प्रथम

कोल्हापूर :
शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आण्णासाहेब डांगे कॉलेज आष्टा येथे घेण्यात आलेल्या इंटर झोरल टेबल टेनिस पुरुष स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालयाच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला. अंतिम सामन्यात या संघाने के.आय.टी. कॉलेजचा ५-४ ने पराभव करुन विजेतेपद मिळविले. या संघात ऋषिकेश नलवडे, आदर्श पाटील, पिनाक पाटकर, केतन सुतार, वरद दिवसे  यांचा समावेश होता.
मागील सलग तीन वर्षे  इंटर झोनल टेबल टेनिस स्पर्धेत प्रथम येऊन विवेकानंद कॉलेजने हॅटट्रिक साधली आहे. या यशाबद्दल टेबल टेनिस पुरुष संघाचे कौतुक व अभिनंदन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेचे सी.ई.ओ. कौस्तुभ गावडे यांनी केले आहे.
या खेळाडूंना विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, जिमखाना विभागप्रमुख डॉ. विकास जाधव, प्रा. संतोष कुंडले, प्रा. प्रशांत कांबळे, प्रा. साद मुजावर, रजिस्ट्रार एस. के. धनवडे, सुरेश चरापले तसेच आई-वडिलांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
74 %
3.1kmh
3 %
Thu
28 °
Fri
28 °
Sat
29 °
Sun
29 °
Mon
29 °

Most Popular

You cannot copy content of this page