• ८० हून अधिक खेळाडूंचा सहभाग
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए) च्यावतीने जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंसाठी आहार (डाएट) या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी ताराबाई पार्क येथील धैर्यप्रसाद हॉलमध्ये झालेल्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध वयोगटांतील ८० हून अधिक क्रिकेटपटू, पालक, प्रशिक्षक आणि पंच सहभागी झाले.
कार्यशाळेत आहारतज्ज्ञ डॉ. निलीमा जिरगे यांनी खेळाडूंच्या क्रीडा कारकिर्दीसह दैनंदिन जीवनात आहाराचा समतोल कसा राखावा, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. प्रथिने, कर्बोदके, फायबर आणि पाणी यांचे शरीरासाठी असलेले महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. खेळाडूंसाठी आहार शाकाहारी की मांसाहारी हा मुद्दा महत्त्वाचा नसून, आहाराचे प्रमाण आणि विशेषतः त्याचा दर्जा महत्त्वाचा आहे, असे डॉ. जिरगे यांनी सांगितले. तसेच खेळाडू आणि पालकांनी विचारलेल्या विविध शंकांचे त्यांनी समर्पक निरसन केले.
डॉ. निलीमा जिरगे यांचे स्वागत संस्थेचे सचिव मदन शेळके यांनी स्मृतिचिन्ह देऊन केले. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, उपाध्यक्ष अभिजीत भोसले, सहसचिव अजित मुळीक, डॉ. संजय पाठारे, किरण रावण, रहीमतनूर खान, साद मुजावर, ज्योती काटकर आदी उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन व आभार जनार्दन यादव यांनी मानले.
——————————
क्रिकेट खेळाडूंच्यासाठी आहारावर कार्यशाळा उत्साहात
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
32
°
C
32
°
30.9
°
62 %
4.6kmh
100 %
Thu
30
°
Fri
29
°
Sat
29
°
Sun
28
°
Mon
28
°

