Homeइतरमहावितरणचा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वीजचोरांना दणका

महावितरणचा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील वीजचोरांना दणका

• विशेष मोहिमेत ५१३ वीजचोरांवर कारवाई
कोल्हापूर :
कोल्हापूर परिमंडल कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात राबविलेल्या विशेष मोहिमेत ५१३ ठिकाणी अनधिकृत वीज वापर करणाऱ्यांना महावितरणकडून दणका देण्यात आला आहे. यामध्ये मीटरमध्ये फेरफार केलेल्या कोल्हापूर मंडलात ८३ वीजचोऱ्यांचा तर सांगली मंडलात २८० वीजचोरांचा समावेश आहे. नियमानुसार दंड व वीजचोरीच्या रकमेचा भरणा न करणाऱ्या या वीजचोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा – २००३ च्या कलम १३५ नुसार फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. तर कलम १२६ प्रमाणे अनधिकृत वीजवापराचे १५० प्रकार आढळून आले आहेत.
वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध कोल्हापूर परिमंडल अंतर्गत नियमित कारवाई सुरु असते. त्यानुसार कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत कोल्हापूर जिल्ह्यात एकूण ४७४१ तर सांगली जिल्ह्यात २९९० वीज ग्राहकांची तपासणी करण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यातील वीजचोरांविरुद्ध मोहिमेत कोल्हापूर शहर विभागात २३, कोल्हापूर ग्रामीण विभाग १ मध्ये १७, कोल्हापूर ग्रामीण विभाग २ मध्ये ९५, जयसिंगपूर विभागात २३, इचलकरंजी विभागात १४ तर गडहिंग्लज विभागात ३६ वीजचोरांवर कलम १२६ व कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येत आहे.
सांगली जिल्ह्यातील वीजचोरांविरुद्ध मोहिमेत सांगली शहर विभागात ४, सांगली ग्रामीण विभागात ४१, कवठेमहांकाळ विभागात ९६, विटा विभागात १०३, तर ईश्वरपूर विभागात ६१ वीजचोरांवर कलम १२६ व कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येत आहे.
वीजचोरीविरुद्ध नियमितपणे सुरु असलेली मोहीम आणखी तीव्र करण्याचे निर्देश कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी दिले आहेत. विजेची चोरी करण्याऐवजी अधिकृत वीजजोडणी घेऊन सुरक्षित वीजपुरवठा घ्यावा व फौजदारी कारवाई व कारावासाची शिक्षा टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
few clouds
32 ° C
32 °
30.9 °
62 %
5.7kmh
11 %
Wed
31 °
Thu
28 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °

Most Popular

You cannot copy content of this page