• पानाफुलांची तोरणे, लटकन, लाईटच्या रंगीबेरंगी माळा व मखरांना विशेष मागणी
कोल्हापूर :
अवघ्या आठ दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झाली आहे. घरोघरी आरास-सजावटीची लगबग वाढली असून, गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध साहित्याने बाजारपेठ सजली आहे. सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गणेशभक्तांची गर्दी होत आहे.
बाप्पांच्या स्वागतासाठी आकर्षक आरास करण्याकडे गणेशभक्तांचा कल असतो. विविध प्रकारच्या सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ सजली आहे. पानाफुलांची तोरणे, फुलांचे गुच्छ, लटकन, रंगीबेरंगी विद्युत माळा आणि विविध प्रकारच्या मखरांना विशेष मागणी आहे. यंदा आकर्षक थ्रीडी डिझाईनचे पडदे, झालर आणि विविध सजावटीच्या वस्तूंनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे.
१४ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार असल्याने अबालवृद्धांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. घरांची रंगरंगोटी करण्याबरोबरच बाप्पांच्या आरासीकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. आकर्षक पडदे, फुलांची तोरणे, रंगीबेरंगी रोषणाई आणि विविध सजावटीच्या साहित्यामुळे घराघरांचे रूप पालटू लागले आहे.
मखर, फुलांच्या माळांना विशेष मागणी….
शहरातील महाद्वार रोड, पापाची तिकटी, बाजारगेट, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी आणि राजारामपुरी परिसरात आरास- सजावटीच्या साहित्याचे स्टॉल थाटण्यात आले आहेत. घरगुती गणेशोत्सवासाठी विविध डिझाईनची मखरे, आकर्षक विद्युत रोषणाई आणि कलाकुसर केलेल्या सजावटींना विशेष मागणी आहे. गणेशमूर्तीच्या बैठकीसाठी आकर्षक पाट-आसन, कापडी पडद्यांचे मंडप व मंदिर, रंगीबेरंगी फुलांच्या माळा, झेंडू व मोगऱ्याच्या लडी, कमळाची फुले, झुरमुळ्या, लटकन, पानाफुलांची तोरणे, वेलवेट व सॅटीनची फुले-पाने, फुलांचे गुच्छ, ग्रीन मॅटिंग, क्रिस्टल बॉल तसेच गणपतीसाठी मोगरा, सॅटीन व मोत्यांचे हार अशा विविध वस्तू उपलब्ध आहेत.
आकर्षक विद्युत रोषणाईच्या माळा, शोभेच्या वस्तू आणि पूजेसाठी आवश्यक साहित्याने स्टॉल सजले असून, पुढील काही दिवसांत खरेदीसाठी आणखी गर्दी वाढण्याची शक्यता आहे. गणरायाच्या आगमनापूर्वीच शहरात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी
RELATED ARTICLES
Mumbai
broken clouds
31
°
C
31
°
30.9
°
70 %
4.6kmh
78 %
Mon
31
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
29
°

