Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स

डी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्स

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, कसबा बावडा येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना विविध नामांकित राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून १८५ हून अधिक जॉब ऑफर्स प्राप्त झाल्या आहेत. हेवलेट-पॅकार्ड (एच पी ) कंपनीमध्ये दोन विद्यार्थ्यांची निवड झाली असून त्यांना ८.५ लाख रुपये वार्षिक पॅकेज मिळाले आहे.
लॉन्च्ड ग्लोबल या कंपनीने सर्वाधिक ४३ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. त्याखालोखाल अनलॉक्स अकॅडमीने २०, वॉलस्टार टेक्नॉलॉजीजने १९, इन्फोसिसने १३, टेस्टयंत्रा सॉफ्टवेअर सोल्युशन्सने १०, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ९, एज्यू व्हर्सिटी बंगळुरू ८, सायबर सक्सेस ६, आणि एक्सेलआरने ५ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज, फोक्सवॅगन इंडिया प्रा. लि., , फॉक्स सोल्युशन्स, मायक्रोलाइज आणि पेगासससह विविध कंपन्यांनीही विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिली.
विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांकडून आकर्षक पॅकेज मिळाले असून एचपीमध्ये ८.५ लाख रुपये, टीसीएसमध्ये व लॉन्च्ड ग्लोबल ७ लाख, अनलॉक्स अकॅडमीमध्ये ६ लाख, पेगासस ५.५ लाख रुपये, फॉक्स सोल्युशन्समध्ये ५.४६ लाख, ४.८ लाख, हेक्सावेअरमध्ये ४ लाख, तर इन्फोसिसमध्ये ३.६ लाख रुपये पॅकेज ऑफर केले आहे.
या निवडीसाठी अधिष्ठाता प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, सीएसई विभागप्रमुख डॉ. राधिका ढणाल, प्लेसमेंट समन्वयक तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, सी.एच.आर.ओ. श्रीलेखा साटम, प्राचार्य डॉ. संतोष चेडे आणि रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे यांनी निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29 ° C
29 °
29 °
79 %
4.6kmh
34 %
Mon
29 °
Tue
28 °
Wed
28 °
Thu
28 °
Fri
29 °

Most Popular

You cannot copy content of this page