• पुरुष दुहेरीत पवन सुरेश व पुनीत सुरेश यांना विजेतेपद
कोल्हापूर :
पुणे जिल्हा मेट्रोपॉलिटन बॅडमिंटन संघटना (पीडीएमबीए) च्यावतीने आयोजित बीडब्ल्यूएफ, बीए, बीएआय आणि एमबीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सुशांत चिपलकट्टीच्या स्मरणार्थ पुणे महापौर करंडक योनेक्स सनराईज भारतीय कुमार आंतरराष्ट्रीय ग्रँड प्रिक्स १९ वर्षांखालील बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या गटात मुंबईच्या देव रुपारेलिया याने तर, मुलींच्या गटात दिल्लीच्या इशिता नेगी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.
या स्पर्धेत मुलांच्या गटात अंतिम सामन्यात अव्वल मानांकित देव रुपारेलिया याने सोळाव्या मानांकित उत्तराखंडच्या
निश्चल चंदचा २१-१६, २१-१६ असा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. मुलींच्या गटात अंतिम सामन्यात १७ वर्षीय दुसऱ्या मानांकित दिल्लीच्या इशिता नेगी हिने महाराष्ट्राच्या गाथा सूर्यवंशीचा २१-१९, २१-१८ असा पराभव करून विजेतेपदाचा मान पटकावला.
पुरुष दुहेरीत अंतिम लढतीत भारताच्या पवन सुरेश याने पुनीत सुरेश च्या साथीत इंडोनेशियाच्या आर्यबका ओक्टा डिसाबियन व मुहम्मद जिलाझिक अर्तांडो झकारिया यांचा २५-२३, २१-१९ असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
मिश्र दुहेरीत अंतिम लढतीत इंडोनेशियाच्या मुहम्मद जिलाझिक अर्तांडो झकारिया व अफिजाह रहमाधानी यांनी भारताच्या पुनित सुरेश व दीपक राज आदिती यांचा २४-२६, २१-१७, २१-१६ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले.
मुलींच्या दुहेरीत अंतिम लढतीत थायलंडच्या चन्थरात मर्ंदाकुल व पर्प्लॉय सुत्तीवारायनॉन या जोडीने चौथ्या मानांकित भारताच्या दिया भीमैया व कीर्थी मंचला यांचा २१-१५, २१-११ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना पुणे महापौर करंडक व रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मंत्री चंद्रकांत पाटील आणि पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सुंदर शेट्टी, गिरीश नातु, मंजुषा सहस्रबुद्धे, योनेक्स सनराइजचे बालकिशन चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीडीएमबीएचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, पीडीएमबीएचे वरिष्ठ उपाध्यक्ष शशांक हळबे, सरचिटणीस सीए रणजीत नातू, सह सचिव आनंद जोशी, खजिनदार सारंग लागू, स्पर्धा संयोजन सचिव राजीव बाग, मिहीर रातांजनकर, उपाध्यक्ष अविनाश जाधव उपस्थित होते.
——————————
बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीत देव रुपारेलिया व इशिता नेगी विजेते
RELATED ARTICLES
Mumbai
light rain
29
°
C
29
°
29
°
79 %
4.6kmh
34 %
Mon
29
°
Tue
28
°
Wed
28
°
Thu
28
°
Fri
29
°

