कोल्हापूर :
वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा महिला (खुला गट) सिनियर मुली फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा जळगाव येथे होत आहेत. या स्पर्धेसाठी के.एस.ए. कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघ रवाना झाला.
या संघासाठी निवड चाचणी व प्रशिक्षण शिबीर महाराष्ट्र हायस्कूल व उषाराजे गर्ल्स हायस्कूल येथे घेण्यात आले. के.एस.ए. फुटबॉल समितीच्या मार्गदर्शनानुसाार प्रशिक्षक पृथ्वी गायकवाड, सोनाली साळवी, शलाका जामदार, अमित शिंत्रे, रघु पाटील यांनी सात दिवसांच्या प्रशिक्षण शिबीरामध्ये खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले व त्यांच्याकडून उत्कृष्ट सराव करून घेतला.
या संघास केएसएचे पेट्रन-इन्-चीफ् खासदार श्री शाहू छत्रपती महाराज, संभाजीराजे छत्रपती, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कार्यकारिणी समिती सदस्य, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या व विफाच्या महिला समिती चेअरमन सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच केएसएचे ऑन. जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, ऑन. जॉईंट जनरल सेक्रेटरी अमर सासने व फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी व केएसए फुटबॉल समितीचे सर्व सदस्य व प्रशिक्षक यांचेही प्रोत्साहन लाभले. संघातील खेळाडू असे : गोलकिपर- आसावरी राजाराम पाटील, युंगधरा लक्ष्मण चौगले व खेळाडू- सानिका दत्तात्रय भोसले, केतकी रविंद्र कोंडसकर, सिमरन बादशाह नावलेकर, जानव्ही विलास ढेरे, संस्कृती संजय तुरूके, समीक्षा प्रशांत पोवार, समीक्षा युवराज मेंगाणे, संध्याराणी सुरेश जानवेकर, पूर्वा सुभाष भोसले, स्नेहल प्रकाश कांबळे, यशस्वी राजेश बेनाडी, गौरी अनिल जगताप, वृषाली विजय भोईटे, श्रुती सचिन झुटाल, समृध्दी अनिल कटकोळे, सानिका काशीनाथ पाटील, आदिती प्रकाश ढेरे, निकीता रामचंद्र मल्लाडे. प्रशिक्षक म्हणून सी लायसन्स प्रशिक्षक सोनाली साळवी म्हणून कामकाज पाहणार आहेत.
——————————

