Homeसामाजिकडीवायपी ग्रुपतर्फे महानगरपालिकेला १५५० एलईडी दिव्यांची भेट

डीवायपी ग्रुपतर्फे महानगरपालिकेला १५५० एलईडी दिव्यांची भेट

• आमदार सतेज डी. पाटील यांच्या हस्ते महापालिका आयुक्त राजेंद्र भारूड यांच्याकडे सुपूर्द
कोल्हापूर :
कोल्हापूर शहरातील नागरिकांना अधिक चांगली व सुरक्षित प्रकाशव्यवस्था उपलब्ध व्हावी, या उद्देशाने डी.वाय.पी. ग्रुपच्यावतीने महानगरपालिकेला १५५० एलईडी दिवे प्रदान करण्यात आले. या उपक्रमाचा लोकार्पण व हस्तांतरण कार्यक्रम विठ्ठल रामजी शिंदे चौकात पार पडला.

विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी बोलताना, शासनाच्या निर्णयाप्रमाणे खाजगी कंपनीला ठेका दिला होता तो ठेका ना मंजूर केल्याने शहरातील बरेच दिवे बंद आहेत. महापौर सौ. रुपाराणी निकम व आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांच्या आवाहनानुसार आमदार सतेज डी. पाटील यांच्या सहकार्याने डी.वाय.पी. ग्रुपच्यावतीने हे एलईडी दिवे देण्यात आले.
आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांनी, या एलईडीचे नियोजन येत्या १० दिवसात शहरातील ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी ते बसविण्यात येईल असे सांगितले.
आमदार सतेज डी. पाटील म्हणाले की, कोल्हापूर शहरात तांत्रिक अडचणीमुळे एलईडी दिव्यांचा एक पेच निर्माण झाला होता. म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की, या एलईडी दिव्यांची ८१ नगरसेवकांवर जबाबदारी आम्ही देणार आहे. शहरातील ज्या ज्या ठिकाणी याची आवश्यकता आहे. त्या ठिकाणी हे एलईडी दिले बसविणार आहे. महापालिका हि कोल्हापूर शहराचा आत्मा आहे. महापालिका व्यवस्थित राहणं, व्यवस्थित ठेवण हे आपले सर्वांचं कर्तव्य आहे. शहरात चांगले उपक्रम, चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न प्रामुख्याने आपण केला पाहिजे. तसेच या शहराला विकसित करण्यासाठी या शहराला एक चांगला चेहरा देण्यासाठी, या शहराच्या विकासामध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करुया.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, प्रभाग समिती सभापती संजय मोहिते, विशाल चव्हाण, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, शहर अभियंता रमेश मस्कर, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, गटनेत्या सौ. प्रतिज्ञा उत्तुरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
28 ° C
28 °
28 °
83 %
5.7kmh
100 %
Sun
29 °
Mon
29 °
Tue
29 °
Wed
29 °
Thu
28 °

Most Popular

You cannot copy content of this page