• कृषी क्षेत्राशी संबंधित विविध संस्थांमध्ये घेतले प्रशिक्षण
कोल्हापूर :
डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथील कृषी अभियांत्रिकी विभागाच्या तृतीय व अंतिम वर्षातील ८९ विद्यार्थ्यांनी देशातील विविध नामांकित शासकीय संस्था, संशोधन केंद्रे, प्रशिक्षण संस्था, उच्च शिक्षण संस्था आणि कृषी उद्योगांमध्ये औद्योगिक व व्यावहारिक प्रशिक्षण पूर्ण केले. वर्गातील सैद्धांतिक ज्ञानाला प्रत्यक्ष कार्यक्षेत्राशी जोडणे, आधुनिक कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची ओळख करून देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये उद्योगाभिमुख कौशल्ये विकसित करणे, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता.
या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी सेंट्रल फार्म मशिनरी ट्रेनिंग अँड टेस्टिंग इन्स्टिट्यूट, बुधनी (मध्य प्रदेश); नॉर्दर्न रिजन फार्म मशिनरी ट्रेनिंग अँड टेस्टिंग इन्स्टिट्यूट, हिसार (हरियाणा); नॉर्थ ईस्टर्न रिजन फार्म मशिनरी ट्रेनिंग अँड टेस्टिंग इन्स्टिट्यूट, बिस्वनाथ चारियाली (आसाम); भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली; भारतीय कृषी अनुसंधान परिषद–इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सॉईल अँड वॉटर कॉन्झर्वेशन, कोटा (राजस्थान) व वसद (गुजरात); नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी एंटरप्रेन्युअरशिप अँड मॅनेजमेंट, कुंडली (हरियाणा); आयआयटी मद्रास; अल्बेडो फाउंडेशन, नाशिक आणि अग्रीनेक्स्ट कन्सल्टन्सी, पुणे आदी संस्थांमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले.
प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी कृषी यंत्रसामग्रीचे संचालन, देखभाल व चाचणी, मृद व जलसंधारण, जलसंधारण संरचनांचे नियोजन, अन्नप्रक्रिया व मूल्यवर्धन, बियाणे तंत्रज्ञान, प्रयोगशाळा व संशोधन पद्धती, डेटा संकलन व विश्लेषण तसेच कृषी क्षेत्रातील तांत्रिक सल्ला सेवा यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
कृषी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. मंगल पाटील यांच्यासह कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रशिक्षण व प्लेसमेंट समन्वयक डॉ. अमोल घाडगे व प्लेसमेंट सेलने या औद्योगिक प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी मेहनत घेतली.
या उल्लेखनीय उपक्रमाबद्दल विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, प्र-कुलपती ऋतुराज पाटील, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता आणि कुलसचिव डॉ. जयेंद्र खोत यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
——————————
डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या ८९ विद्यार्थ्यांचे औद्योगिक प्रशिक्षण यशस्वी
RELATED ARTICLES
Mumbai
overcast clouds
28
°
C
28
°
28
°
83 %
4.6kmh
97 %
Mon
28
°
Tue
29
°
Wed
29
°
Thu
29
°
Fri
28
°

