Homeशैक्षणिक - उद्योग डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये नागपंचमीनिमित्त सापांबाबत शास्त्रीय मार्गदर्शन

डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसमध्ये नागपंचमीनिमित्त सापांबाबत शास्त्रीय मार्गदर्शन

कोल्हापूर :
डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, तळसंदे येथे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने नागपंचमीनिमित्त ‘सर्प जनजागृती व सुरक्षितता कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला. सापांविषयीचे गैरसमज दूर करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, विषारी व बिनविषारी सापांची ओळख करून देणे तसेच सर्पदंशाच्यावेळी घ्यायच्या खबरदारीबाबत जनजागृती करणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता.
यावेळी वन्य जीव अभ्यासक देवेंद्र भोसले यांनी सापांच्या विविध प्रजाती, त्यांची वैशिष्ट्ये, अधिवास व वर्तन याबाबत शास्त्रीय माहिती दिली. नाग, घोणस आणि मण्यार यांसारख्या प्रमुख विषारी सापांची ओळख करून देताना साप दिसल्यास घाबरून न जाता सुरक्षित पद्धतीने परिस्थिती हाताळण्याचे आवाहन त्यांनी केले. सर्पदंश झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक असून, अंधश्रद्धेवर आधारित किंवा चुकीच्या घरगुती उपचारांमुळे वेळ वाया घालवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
साप हा मानवाचा शत्रू नसून निसर्गातील महत्त्वाचा घटक आहे, असे सांगत साप पर्यावरणातील जैवविविधता व अन्नसाखळीचे संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे भोसले यांनी नमूद केले. त्यामुळे सापांना मारण्याऐवजी योग्य माहितीच्या आधारे मानव-सर्प सहअस्तित्वाचा दृष्टिकोन विकसित करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. एस. आर. पावसकर यांनी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक ज्ञानासोबत समाजोपयोगी व पर्यावरणपूरक दृष्टिकोन विकसित करण्याची गरज व्यक्त केली. या उपक्रमामुळे सापांबाबतची भीती वगैरे समज दूर होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, टेक्निकल कॅम्पस संचालक डॉ. सतीश पावसकर, अधिष्ठाता प्रा. आर. एस. पोवार आणि असिस्टंट रजिस्ट्रार जितेंद्र पोवार यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————————-

RELATED ARTICLES
Mumbai
light rain
30 ° C
30 °
28.9 °
70 %
5.7kmh
93 %
Thu
29 °
Fri
28 °
Sat
28 °
Sun
28 °
Mon
28 °

Most Popular

You cannot copy content of this page